माथाडींचे काम बंद आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माथाडींचे काम बंद आंदोलन
माथाडींचे काम बंद आंदोलन

माथाडींचे काम बंद आंदोलन

sakal_logo
By

21102
----
माथाडींचे काम बंद आंदोलन
पगारवाढ करण्याची मागणी; कंपन्या, वेअरहाऊसमधील कामकाज ठप्प
इचलकरंजी, ता. ११ ः पगारवाढ करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी शहरातील माथाडी कामगारांनी बुधवारी काम बंद आंदोलन केले. अचानक सुरू केलेल्या आंदोलनामुळे शहरातील विविध कंपन्या, वेअरहाऊसमधील काम ठप्प झाले होते. आंदोलन कोणत्याही कामगार नेत्यांशिवाय स्वत: कामगारांनी सुरू केल्याने चर्चा सुरू होती.
इचलकरंजी शहरात विविध कंपन्या, वेअरहाऊसमध्ये काम करणाऱ्‍या माथाडी कामगारांची संख्या मोठी आहे. या कामगारांच्या पगारवाढ, इतर सोयी-सवलतीसंदर्भात यापूर्वी केलेल्या कराराची मुदत ३१ मार्च रोजी संपुष्टात आली आहे. सध्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. महागाई व कामगारांना करावे लागणारे कष्ट याच्या तुलनेत सध्या मिळणाऱ्या मजुरी दर व इतर सोयी-सवलतीमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. लोडिंग, अन्‌लोडिंग कामासाठी प्रती टन १८० रुपये करावी, सूत बाचकी १२ चाकी वाहनासाठी वाराई ३ हजार, १० चाकीसाठी अडीच हजार व ६ चाकीसाठी २ हजार मजुरी द्यावी, सूत बाचकी उतरवणे व भरणे प्रती नग १० रुपये देण्यात यावी, माथाडी कामगारांना बोनस वाढ देण्यात यावी, कामगारांच्या मुलांसाठी शालेय साहित्य मिळावेत, यासह विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करीत असल्याचे कामगारांच्या वतीने सांगण्यात आले, तर या आंदोलनाबाबत मार्ग काढण्याची हालचाली सुरू होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57183 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top