
रिपाईंतर्फे निदर्शने
21176
गॅस दरवाढ कमी करा
रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटातर्फे निदर्शने
कोल्हापूर, ता. ११ : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाक गॅसच्या किमती भरमसाठ वाढविल्या आहेत. पेट्रोलने १२० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून, डिझेल १०० रुपये लिटरवर गेले आहे. स्वयंपाकाचा गॅसही १००० रुपये झाला. इंधन दरवाढ म्हणजे अप्रत्यक्षरित्या सर्व वस्तूंची दरवाढ असते. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. तरी शासनाने गॅस आणि इंधन दरवाढ त्वरित कमी करावी, या मागणीसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (गवई गट) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. तसेच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबरोबर अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने केली.
खाद्यतेल आणि डाळीचे वाढलेले दर कमी करा, जातीच्या दाखल्यांसाठी प्रांताधिकारी महसुली पुरावा मागतात, तो रद्द करावा. संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजनेसाठी २१ हजार रुपयांची उत्पन्नाची मर्यादा असून उत्पन्नाची मर्यादा पन्नास हजारांपर्यंत करावी. करवीर तहसीलमध्ये विभक्त रेशनकार्ड त्वरित द्यावे. रेशनकार्डात नवीन नोंद झालेल्या कुटुंबांना रेशन मिळावे. सर्व साखर कारखान्यांमध्ये मागासवर्गीय अनुशेष भरावा. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपमध्ये वाढ करावी, दलितांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी करावी. या मागण्यांची पूर्तता शासनाकडून व्हावी.
भीमराव कांबळे, सिद्धार्थ देशमुख, प्रकाश कांबळे, साताप्पा कांबळे, अशोक घाडगे, अशोक पनोरीकर, युवराज गायकवाड, रंगराव कांबळे, मधुकर कांबळे, चंद्रकांत कांबळे आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57184 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..