
जाहिरात बातमी
21133
‘लोकनगरी’ गृहप्रकल्पाला
‘सर्टिफिकेट ऑफ मेरिट’ पुरस्कार
कोल्हापूर, ता. ११ ः दर्जेदार बांधकाम आणि सर्वसुविधायुक्त गृहप्रकल्पाची उभारणी ही कोल्हापुरातील रामसिना ग्रुपची विशेष ओळख समजली जाते. वैशिष्ट्यपूर्ण वास्तूरचनेमुळे बांधकाम क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केलेल्या रामसिना ग्रुपच्या ‘लोकनगरी’या गृहप्रकल्पाला केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाकडून ‘गुणवत्ता प्रमाणपत्र २०२२’(सर्टिफिकेट ऑफ मेरिट) जाहीर झाले आहे. विशेष म्हणजे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधलेल्या या गृहप्रकल्पाला दुसऱ्यांदा ‘गुणवत्ता प्रमाणपत्र’ जाहीर झाले. केंद्रीय गृहनिर्माणमंत्री हरदिपसिंग पुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण आज नवी दिल्ली येथे झाले.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत देशभर सर्वत्र गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयातर्फे अशा प्रकल्पांची विविध पातळीवर तपासणी होते. त्यातील निवडक गृहप्रकल्पांना गुणवत्ता प्रमाणपत्र (सर्टिफिकेट ऑफ मेरिट) प्रदान केले जाते. त्यानुसार या पुरस्कारांच्या विजेत्यांच्या यादीमध्ये रामसिना ग्रुपच्या ‘लोकनगरी’ गृहप्रकल्पाचा समावेश आहे. संपूर्ण राज्यभरातून पुरस्कारप्राप्त हा एकमेव गृहप्रकल्प आहे. यासंबंधीचे पत्र नुकतेच केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाकडून प्राप्त झाले.
केंद्रीय समितीकडून डिसेंबर २०२१ मध्ये प्रकल्पाची तपासणी झाली होती. तत्पूर्वी पुरस्काराच्या नामांकनासाठी रामसिना ग्रुपतर्फे लोकनगरी गृहप्रकल्पासाठी प्रस्ताव सादर केला होता. हवामानपूरक प्रकल्प, उत्तम रचना, पार्किंग व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, आवश्यक साधन सुविधा, सुरक्षितता, आयएसआय गुणवत्ता प्रमाणपत्र बांधकाम साहित्य, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उतारमार्गची सोय आदी निकषांच्या आधारे हा पुरस्कार जाहीर झाला.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधकाम केलेल्या या गृहप्रकल्पाला दुसऱ्यांदा राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता प्रमाणपत्र पुरस्कार मिळतोय हे अतिशय आनंददायी आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवल्याचे रामसिना ग्रुपचे चेअरमन
सचिन ओसवाल यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57188 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..