विमानतळ विस्तारीकरण फायद्याचेच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमानतळ विस्तारीकरण फायद्याचेच
विमानतळ विस्तारीकरण फायद्याचेच

विमानतळ विस्तारीकरण फायद्याचेच

sakal_logo
By

विमानतळाचा विस्तार; कोल्हापूरचा विकास
६४ एकरचे भूसंपादन सुरू; लवकरच कार्गोसेवा सुरू होण्याचे संकेत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः विमानतळ विस्तारीकरणातून कोल्हापूरचा विस्तार होत आहे. म्हणूनच नव्याने होणारे ६४ एकराचे भूसंपादन तातडीने होणे आवश्‍यक आहे. येथे लवकरच कार्गो सेवा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. कार्गो सेवा (मालवाहतूक) सुरू झाल्यावर राज्यातील तीन जिल्ह्यातील तर शेजारील कर्नाटकातील निपाणीच्याही उद्योग व्यवसायासाठी चालना मिळणार आहे. कोल्हापूर विमानतळातील धावपट्टी विस्तारली तर भविष्यातील अनेक प्रश्‍न अपोआपच निकाली निघणार आहेत. त्यामुळेच भूसंपादनाचे काम वेगाने होण्यास स्थानिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.
कोल्हापुरात कार्गो सेवा सुरू झाल्यास तेथून गूळ-साखरेपासून ते खतापर्यंतच्या वाहतुकीत वाढ होईल. शिरोळसह ग्रामीण भागातील भाजीपाला तासादोनतासांत थेट परराज्यात पोचेल. हैदराबाद, कोलकत्ता येथून येणारे मत्स्यबीज थेट कोल्हापुरात पोचेल, सध्या ते पुण्यातून उतरून घ्यावे लागते. इचलकरंजीच्या कापड व्यवसायात वाढ होईल. कोल्हापुरातील अनेक उत्पादने थेट मेट्रोसिटीमध्ये विक्रीस जातील. यातून परराज्यात खप वाढेल आणि उत्पादनाबरोबरच आर्थिक स्तर वाढेल. सध्या सुरुवातीच्या काळात प्रवासी आणि मालवाहतूक अशी एकत्रित सेवा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.
पर्यटनाच्या दृष्टीने कोल्हापूर-तिरुपती-कोल्हापूर विमानसेवा सुरू झाल्यामुळे कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यातील भाविक या सेवेचा लाभ घेत आहेत. तिरुपतीतून परतल्यावर अंबाबाई मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी थांबतात. विमानतळ विस्तारीकरण झाल्यास मेट्रोसिटीतील पर्यटक वाढेल. सध्या हैदराबाद विमानसेवा सुरू असल्यामुळे तेथील पर्यटनासाठी शंभर पैकी १५-२० व्यक्ती कोल्हापुरातून जात असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे विमानसेवा विस्तारली तर पर्यटन व्यवसाय विस्तारणार हे अधोरेखित होत आहे.

स्थानिकांचे बळ हवे
विमानतळ विस्तारीकरणासाठी सध्या सुरू असलेल्या ६४ एकर जमिनीचे भूसंपादन तातडीने झाल्यास धावपट्टी वाढीचा मार्ग मोकळा होणार आहे. २१२ कोटींचा निधी मंजूर झाल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जाहीर केले. यातून गडमुडशिंगी, तामगाव परिसरातील भूसंपादन सुरू झाले आहे. त्याला स्थानिकांनी गती दिल्यास नक्कीच विस्तारीकरणाचा वेग वाढणार आहे.

कोट
नाईट लॅण्‍डिंग आणि मेट्रोसिटीतील कनेक्टिव्हीटी वाढली तर नक्कीच परदेशातील उद्योजक थेट कोल्हापूरशी जोडला जाईल. सध्या हैदराबाद आणि बंगळूर जोडल्यामुळे परदेशातील उद्योजकांची कनेक्टिव्हीटी वाढत आहे. मुंबईसह इतर ठिकाणी ही सेवा सुरू झाल्यास उत्पादन आयटी उद्योगाला चालना मिळेल. विमान कनेक्टीव्ही नसल्यास कोल्हापूर छोटे शहर आहे, अशी भावना होते. यातून कळत न कळत बेरोजगारीचा प्रश्‍न निकाली लागणार आहे.
गोरख माळी, उद्योजक

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57191 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top