महागावात नवा शिवपुतळा बसविणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महागावात नवा शिवपुतळा बसविणार
महागावात नवा शिवपुतळा बसविणार

महागावात नवा शिवपुतळा बसविणार

sakal_logo
By

21111
महागाव : शिवाजी महाराज पुतळ्यासंदर्भात आयोजित गावसभेत बोलताना ज्योस्ना पताडे. शेजारी निवृत्ती मांडेकर, संदीप धनवडे, फिरोज सोलापुरे आदी.

महागावात नवा शिवपुतळा बसविणार
गावसभेत ठराव; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पुतळ्याची प्रतिष्ठापना
सकाळ वृत्तसेवा
महागाव, ता. ११ : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन की, जुना पुतळा प्रतिष्ठापीत करायचा, या विषयावर आज गावसभा झाली. सरपंच ज्योस्ना पताडे अध्यक्षस्थानी होत्या. या गावसभेत ६ जूनपूर्वी शिवाजी चौकात नवीन पुतळा बसविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच यासंबंधीचे आदेश होण्यासाठी पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचेही ठरले.
११ मे १९६७ रोजी तत्कालीन खासदार कै. भाऊसाहेब देसाई-महागावकर व बंधुंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातुचा अर्धपूतळा शिवाजी महाराज तरुण मंडळाकडे सुपूर्द केला. त्याची प्रतिष्ठापना २९ एप्रिल १९६८ रोजी छत्रपती घराण्याच्या वंशज श्रीमंत सुमित्राराजे भोसले (सातारा) यांच्या हस्ते करण्यात आला. २०१६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभिकरणाचे काम सुरू करण्यात आले. सुशोभिकरणानंतर या चौकात जुनाच पुतळा प्रतिष्ठापना करायचा की, नवीन पुर्णाकृती बसवायचा, या मुद्यावर २०१९ मध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले. हा प्रश्‍न स्थानिक पातळीवर सुटला नाही. यामुळे प्रांताधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली. परंतु कोणताच निर्णय अद्याप झालेला नाही. दरम्यान, आज नवा की जुना पुतळा बसवायचा, याचा निर्णय घेण्यासाठी गावसभा घेण्यात आली. या सभेत नवीन पुतळा बसवण्याचा निर्णय झाला. या गावसभेच्या ठरावासह जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी मागणीबाबतचे निवेदन देण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश होताच नवीन पुर्णाकृती पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
या वेळी सरपंच पताडे, शिवाजी माने, उपसरपंच निवृत्ती मांडेकर, संजय रेडेकर, विजय पन्हाळकर, अ‍ॅड. बाबासाहेब कोले यांची भाषणे झाली. फिरोज सोलापुरे, भूषण देसाई, उदय सोमशेट्टी, अजित पेडणेकर, ग्रामविकास अधिकारी संदीप धनवडे, अमर कडाकणे, महादेव घुगरे, स्मिता महंत, पाडूरंग शिंदे, दिनकर इंजल, विठ्ठल करवळ, बाळासाहेब कुपटे, बाबुराव जोशीलकर, महादेव कडाकणे आदी उपस्थित होते.
---------------
चौकट
जुन्या पुतळ्यावर ठाम : देसाई
याबाबत शिवाजी महाराज तरूण मंडळाचे कार्याध्यक्ष भूषण देसाई म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नवा की, जुना बसवायचा, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसमोर अर्ज आहे. या अर्जावरील आदेशाच्या प्रतिक्षेत आम्ही आहोत. सुशोभीकरण केलेल्या शिवाजी चौकात जुनाच पुतळा बसविणेत यावा. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विश्‍लेषणात्मक निवेदन दिलेले आहे. जुन्या पुतळ्याला ऐतिहासिक वारसा आहे. यामुळे जुनाच पुतळा बसविण्यावर आम्ही ठाम आहोत.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57204 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top