श्री महालक्ष्मी मंदिर वास्तूशांती सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री महालक्ष्मी मंदिर वास्तूशांती सोहळा
श्री महालक्ष्मी मंदिर वास्तूशांती सोहळा

श्री महालक्ष्मी मंदिर वास्तूशांती सोहळा

sakal_logo
By

21134
श्री महालक्ष्मी मंदिर वास्तुशांती सोहळा, हलकर्णी

जिद्दीने साकारले महालक्ष्मी मंदिर

लीड
हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील जीर्णोद्धार झालेल्या श्री महालक्ष्मी मंदिराची वास्तुशांती व कलशारोहन कार्यक्रम प. पू. सोमेश्‍वर शिवाचार्य महास्वामीजीं यांच्या दिव्य सानिध्यात होत आहे. या सोहळ्याचा उद्या (गुरुवार) मुख्य दिवस आहे. त्यानिमित्त...
- विठ्ठल चौगुले, नूल
-----------------------------

गावात यात्रा व्हावी, महालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा, अशा विचारसरणीची माणसं एकत्रित आली त्यांनी यात्रा ही केली आणि आता जीर्णोद्धाराचा संकल्पही पूर्ण केला आहे. त्यामुळे यात्रा समिती, मंदिर जीर्णोद्धार समितीसह हक्कदार, पुजारी व भाविकांचे कौतुक होत आहे. २०१७ मधील यात्रेच्या समारोपप्रसंगी भाविकांनी मंदिर जीर्णोद्धारासाठी काही रक्कम देणगी स्वरूपात गोळा केली होती. याच पायावर मोठ्या धाडसाने यात्रा कमिटी आणि मंदिर समितीने मंदिर बांधकामाचा विडा उचलला. २०२० व २०२१ या दोन्ही वर्षात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे थोडीशी आलेली मरगळ वगळता उर्वरित कालावधीत सर्व कामे वेळेत आणि तत्परतेने पूर्ण करत मंदिर समितीने सुरेख व देखणे मंदिर उभारले आहे. या जीर्णोद्धारीत मंदिराचे कलशारोहन, वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळाही उत्साहात व्हावा म्हणून गेले महिनाभर हजारो हात राबत आहेत. अनेक भाविकांनी मंदिर हेच आपले घर समजून निरपेक्षपणे देवीची सेवा चालवली आहे. मंदिराचे बांधकाम सुरू असताना दुरडी-बुट्टी घेऊन महिला भाविक वाद्यांच्या गजरात मंदिराकडे येत असत. दर मंगळवारी हा कार्यक्रम चालायचा. स्वतंत्रपणे महाप्रसादाचे आयोजन करीत उत्साहाने हा कार्यक्रम पूर्ण होत असे. जीर्णोद्धार समितीला ग्रामस्थांनी साथ दिल्याने मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प वेळेत पूर्ण करण्यात यश आले.
प्रशस्त हॉल आणि संरक्षक भिंत व्हावी म्हणून माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी मंदिरासाठी मोठा हातभार लावला. आमदार राजेश पाटील यांनी मंदिर परिसरात पेव्‍हिंग ब्लॉकसाठी निधी दिला. वैशाली गुरव यांनीही मंदिर बांधकामास निधी दिला. समाजरत्न गंगाधर व्हसकोटी, युवा नेते सदानंद हत्तरकी, माजी जि. प. सदस्या रेखाताई हत्तरकी, जयकुमार मुन्नोळी, तंटामुक्त उपाध्यक्ष विजय शेरवी यांनी शासकीय निधीसाठी प्रयत्न केले. यात्रा कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले, माजी सरपंच के. के. पाटील, ठेकेदार आनंदा राऊत यांच्यासह सर्व हक्कदार, पुजारी भाविकांनी मंदिर वेळेत व उत्तम पूर्णत्वास नेण्यास सहकार्य केले.
हलकर्णी आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून महालक्ष्मीची ओळख आहे. येथील संस्थानिक हिंमत बहादूर यांनी १८५६ मध्ये महालक्ष्मीची मंदिराची स्थापना केल्याची नोंद आहे. गावच्या मध्यवस्तीत हे मंदिर आहे. पूर्वीचे मंदिर कौलारू होते. पूर्वेला दगडी बांधकामाचे व साधे कौलारू छपर, चौथऱ्यावर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. संपूर्ण लोकवर्गणीतून हे मंदिर उभारले आहे. मंदिर बांधकामासाठी घडई केलेले आरभावी गुलाबी दगडांचा वापर केला आहे. मंदिरासमोर २१ फुटी दीपस्तंभ बांधला आहे. सव्वादोन फुटी जुनी मूर्तीच प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष डॉ. गंगाधर व्हसकोटी व उपाध्यक्ष विजय शेरवी यांच्या नेतृत्वाखाली ७२ लोकांची समितीने हा संकल्प पूर्णत्वाला नेला आहे. भुतरामहट्टीचे प. पू. श्री सोमेश्‍वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सानिध्यात आज (ता. १२) मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन कार्यक्रम होत आहे. यानिमित्त जीर्णोद्धार कमिटीतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सोहळ्यानंतर महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57229 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top