उदगाव ग्रामस्‍थांचे आंदोलन बेदखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उदगाव ग्रामस्‍थांचे आंदोलन बेदखल
उदगाव ग्रामस्‍थांचे आंदोलन बेदखल

उदगाव ग्रामस्‍थांचे आंदोलन बेदखल

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...

उदगाव ग्रामस्‍थांचे
आंदोलन बेदखल
सरपंच, ग्रामसेवकाच्या चौकशीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ११ : उदगाव (ता. शिरोळ) येथील सरपंच व ग्रामसेवकांनी केलेल्या भ्रष्‍ट कारभाराची चौकशी करावी, असे सांगत ग्रामपंचायत सदस्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारपासून सदस्य व ग्रामस्‍थ जिल्‍हा परिषदेच्या आवारात बेमुदत आंदोलनास बसले आहेत. आंदोलनाकडे जिल्‍हा परिषदेने अजून लक्ष दिलेले नाही. दोन दिवसांत एकही अधिकारी आंदोलकांना भेटण्यास आलेला नाही. त्यामुळे आंदोलकांकडून संताप व्यक्‍त होत आहे.
बहुमताने निर्णय अपेक्षित असताना तसेच अनेक ठरावांना बहुमताने विरोध केला असतानाही त्यांची मंजुरी होत असल्याची तक्रार सदस्यांनी केली आहे. अनेक ठिकाणी बनावट खर्च दाखवून पैसे हडपल्याचा आरोप केला आहे. आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांच्या नेतृत्‍वात सुरू आहे. आज या आंदोलनाला संघटनेचे नेते प्रा. जालंदर पाटील व इतर नेत्यांनी भेट दिली. असे असले तरी प्रशासनाने लक्ष दिलेले नाही.

आंदोलकांच्या मागण्या रास्‍त आहेत. प्रशासनाने याची दखल घेत चर्चा करणे आवश्यक होते. आम्‍ही सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहोत. याची दखल घेतली नाही, तर शेतकरी संघटना स्‍टाईलने आंदोलन केले जाईल. हे आंदोलन जिल्‍हा परिषद प्रशासनाला परवडणारे नाही.
- रमेश भोजकर, स्‍वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57235 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top