जिल्‍हा परिषदेत शुकशुकाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्‍हा परिषदेत शुकशुकाट
जिल्‍हा परिषदेत शुकशुकाट

जिल्‍हा परिषदेत शुकशुकाट

sakal_logo
By

सीईओ मुंबईत;
अधिकारी भागात
जिल्‍हा परिषदेत शुकशुकाट
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ११ : प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक पदोन्नतीप्रकरणी मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस प्रशासक संजयसिंह चव्‍हाण उपस्‍थित होते. दरम्यान, प्रशासक दौऱ्यावर असल्याने अनेक अधिकारीही भागात गेल्याचे कार्यालयातून सांगण्यात आले. २१ मार्चपासून जिल्‍हा परिषदेत प्रशासकीय कारभार सुरू आहे. ३१ मार्चपर्यंत प्रलंबित कामांसाठी काही सदस्य येत राहिले; मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सदस्यांनीही मुदत संपल्याने जिल्‍हा परिषदेकडे पाठ फिरवली आहे. पदाधिकारी, सदस्य नसल्याने नागरिकांचे येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे जिल्‍हा परिषदेतील वर्दळ मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. यातच आज मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्‍हाण मुख्यालयात नसल्याने अनेक खातेप्रमुखांनी भागात जाणे पसंत केले. त्यामुळे जिल्‍हा परिषदेत दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57243 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top