
पत्रके बातम्या एकत्रित पत्रके
फक्त फोटो 21141
कोल्हापूर : डी. डी. शिंदे सरकार कॉलेजमधील सहा विद्यार्थ्यांची इन्फोसिस म्हैसूर येथे निवड झाली. यामध्ये शिवानी पाटील, श्रेया जोशी, सुयश पाटील, समृद्धी पाटील, भाग्यश्री मिसाळ, ईशीता आयरेकर यांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातर्फे अभिनंदन केले. सरस्वती एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा माधुरी चारुदत्त शिंदे, प्रभारी प्राचार्य डी. एन. देसाई, संचालक प्रथमेश शिंदे, प्लेसमेंट सेल समितीचे प्रमुख डॉ. ए. बी. पाटील, डॉ. प्रदीप पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
...
21160
रवींद्र वराळे यांची निवड
कोल्हापूर : नॅचरोपॅथी आणि योगा डॉक्टर्स असोसिएशनच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी रवींद्र वराळे यांची निवड झाली. डॉक्टरांसाठी नॅचरोपॅथी आणि योगा मल्टीपर्पज् असोसिएशनची राष्ट्रीयस्तरावर स्थापना झाली. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रणजित बसवनाथे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. नारायण अंभोरे यांनी ही निवड केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57247 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..