निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवेदन
निवेदन

निवेदन

sakal_logo
By

21178

बनावट कब्जापट्टी प्रकरणांची
चौकशी करण्याची मागणी

कृती समितीचे तहसीलदारांना निवेदन

कोल्हापूर, ता. ११ :  करवीर ग्रामीण भागातील गृहनिर्माण संस्थांनी सभासदांना कागदपत्रांच्या पूर्ततेसह प्लॉट नावावर करून दिले होते. परंतु, काही संस्थांच्या नवीन संचालक मंडळाने जुन्या सभासदांच्या नावे असणारे खुले प्लॉट संबंधित लोकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे कब्जापट्टी करून दिले आहेत. त्यामुळे अनेकांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणांची चौकशी व्हावी, अशी मागणी शहर व जिल्हा नागरी कृती समितीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली.  
बनावट कब्जेपट्टीच्या आधारे तलाठी,  सर्कल अधिकारी नवीन बनावट सभासदांचा शेतसारा, विविध प्रकारचे शासकीय शुल्क भरून घेऊन त्यांच्या पावत्या देत असल्याने त्या पावतीच्या आधारे असे हे नवीन सभासद त्या प्लॉटवर अतिक्रमण करून वीज, पाणी, जोडणी उपलब्ध करून घेत आहेत. या संदर्भात काही नागरिकांनी या प्रकरणांचे कागदोपत्री पुरावे सादर केले असतानाही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करून अशा गैरव्यवहारांना पाठबळ देत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. रमेश मोरे, अशोक पोवार, कादर मलबारी, शैलेश मंडलिक, युवराज सुतार, भाऊ घोडके, विनोद डुणुंग, चंद्रकांत पाटील, रमाकांत आंग्रे, पप्पू सुर्वे, महेश जाधव, महेश लोखंडे, लहुजी शिंदे, अमर सुतार, अरविंद पवार, चंद्रकांत पाटील, अभिजित पवार, बाजीराव नाईक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57260 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top