भिक मागो आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिक मागो आंदोलन
भिक मागो आंदोलन

भिक मागो आंदोलन

sakal_logo
By

‘कष्टकरी शेतमजूर’तर्फे
आज भीक मागो आंदोलन
इचलकरंजी : महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेतर्फे प्रांत कार्यालनासमोर ठिय्या आंदोलन सुरूच राहिले. संतप्त आंदोलकांनी आता उद्या (ता.१२) भीक मागो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आज आंदोलकांनी प्रशासनाचा जोरजोरात घोषणा देत निषेध केला. पेन्शनधारकांच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
-------
01620
सुष्मिता पाटील
महाराष्ट्र संघात
पेठवडगाव ः येथील देवगिरी फायटर्स व वडगाव हॉकी अॅकॅडमीची राष्ट्रीय खेळाडू सुष्मिता पाटीलची भोपाळ (मध्य प्रदेश) येथे होणाऱ्या बाराव्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी ही तिची निवड झाली आहे. सुस्मिता सध्या स्पोर्टस्‌ अॅथॉरटी इंडिया सेंटर, कांदिवली, मुंबई येथे हॉकी प्रशिक्षण घेत आहे. तिला माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, माजी नगराध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव, माजी नगराध्यक्ष विद्या पोळ, हॉकी महाराष्ट्राचे सचिव मनोज भोरे, कोल्हापूर अध्यक्ष सुरेखा पाटील, अभिजित गायकवाड आदींचे प्रोत्साहन लाभले.
----------
01619
ओंकार कावरे
याची निवड
पेठवडगाव : येथील देवगिरी फायटर्स व वडगाव हॉकी अॅकॅडमीचा राष्ट्रीय खेळाडू ओंकार कावरे याची गोवा येथे होणाऱ्या सब ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी हॉकी इंडियाकडून निवड झाली. त्याला माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, माजी नगराध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव, माजी नगराध्यक्षा विद्या पोळ, हॉकी महाराष्ट्राचे सचिव मनोज भोरे, हॉकी कोल्हापूर अध्यक्षा सुरेखा पाटील, मोहन भांडवले, राष्ट्रीय पंच दिग्विजय नाईक व अभिजित गायकवाड यांचे प्रोत्साहन मिळाले. क्रीडा मार्गदर्शक संताजी भोसले, हॉकी प्रशिक्षक राहुल गावडे, दीपक पाटील, सिद्धांत पाटील-बुद्धिहाळकर, विजय जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57275 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top