
शिरोळ तालुक्यात महापूर
महापूर नियंत्रणासाठी
उच्च न्यायालयात याचिका
ॲड. सुशांत पाटील; उपाययोजना करण्याची मागणी
कोल्हापूर, ता. ११ : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह शिरोळ तालुक्यात महापूर नियंत्रणाच्या उपाययोजना तत्काळ कराव्यात यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याची माहिती शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्या वतीने ॲड. सुशांत पाटील यांनी आज दिली.
श्री. पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्यात २००५ मध्ये आलेल्या महापुराचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसला. यावेळी क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता. त्यानंतर आतापर्यंत अनेक वेळा महापूर आला; पण शासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले होते. उपोषणही केले. तरीही शासनाकडून किंवा जिल्हा प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. आता पुन्हा एकदा पुराचे सावट दिसत आहे. या पुरामुळे अलमट्टी, बागलकोट, हिप्परगी मांजरी, राजापूर पूरग्रस्त भागात सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दौरा केला. यामध्ये समुद्र सपाटीपासून उंची असून, हिप्परगी धरण हे कृष्णा नदीवर आहे. त्याचे दरवाजे आणि त्याचा ७ ते ८ किलोमीटरचा भराव व अन्य कारणे शोधली. त्यानंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या याचिकेमुळे पूरग्रस्तांना किंवा भविष्यात पूर कमी होण्यास कराव्या लागणाऱ्या उपाययोजना केल्या जातील.’’
अध्यक्ष रामचंद्र डांगे म्हणाले, ‘‘राजापूर येथे २ मीटरचा गाळ आहे. येथे साठा होणाऱ्या आणि अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येणाऱ्या पाण्याची पातळी कमी अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे यावर विस्तृतपणे चौकशी होऊन उपाययोजना झाल्या पाहिजेत.’’
यावेळी बाळासाहेब गाली, विनोद पुजारी, दगडू माने, सुनील इनामदार, भास्कर कुंभार, अविनाश पाटील उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57287 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..