
दिलबहारची खंडोबावर मात
२११६५
कोल्हापूर : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत बुधवारी दिलबहार विरुद्ध खंडोबा यांच्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
दिलबहारची खंडोबावर मात
कोल्हापूर, ता. ११ : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळाने बुधवारी खंडोबा तालीम मंडळावर २ - १ ने विजय मिळवला. अटीतटीच्या सामन्यातील चुरस शेवटच्या क्षणापर्यंत कायम होती.
खंडोबा संघाचा आघाडीच्या खेळाडूंवरील दोन सामन्यांची बंदीचा परिणाम मैदानावर जाणवला. सामन्याच्या सुरुवातीपासून तुल्यबळ खेळ करत दोन्ही संघांनी आघाडी घेण्याचे प्रयत्न केले. यात दिलबहारला यश येऊन सामन्याच्या २४ व्या मिनिटाला रोहन दाभोलकर याने गोल नोंदवत १ - ० अशी आघाडी घेतली. यानंतर पुन्हा आक्रमक चढाया केल्या मात्र यश आले नाही. दरम्यान, खंडोबाच्या मध्य फळीने चाणाक्ष खेळ करत फुटबॉल लिलया हिसकावला. यानंतर आक्रमण केले. तेथे कुणाल दळवी याने ३७ व्या मिनिटाला गोल नोंदवला. पूर्वार्धात सामना एक-एक असा बरोबरीत होता. उत्तरार्धात दिलबहारने आक्रमक खेळ केला; मात्र खंडोबाच्या बचाव फळीने चांगला खेळ करत गोल होऊ दिले नाहीत. अखेर शुभम माळी याने ४६ व्या मिनिटाला गोल नोंदवत दिलबहारला २ - १ अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. खंडोबाच्या खेळाडूंचे अनेक प्रयत्न फसले. अखेर सामना दिलबहार ने २ - १ असा जिंकला. ‘सामनावीर’ म्हणून दिलबहारच्या सुशांत अतिग्रे याला गौरवण्यात आले.
आजचा सामना
सायंकाळी चार : शिवाजी मंडळ विरुद्ध फुलेवाडी
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57295 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..