महिला विक्रेत्या टुडे पान चारसाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला विक्रेत्या टुडे पान चारसाठी
महिला विक्रेत्या टुडे पान चारसाठी

महिला विक्रेत्या टुडे पान चारसाठी

sakal_logo
By

फोटो
21174
मेहरून मुल्ला

एकसष्टीमध्येही कार्यरत!
धाडस आणि जिद्द असली की कोणतेही कष्ट घेण्याची माणसाची तयारी होते आणि त्यासाठीची ताकद त्याच्यामध्ये येते. आत्मविश्वासाच्या बळावर मोठमोठी शिखरे पादाक्रांत केली जातात. कोल्हापुरातील सुतारमळा येथे राहणाऱ्या मेहरुन इब्राहिम मुल्ला यांनी आयुष्यभर कष्ट केले आणि संसाराचा गाडा नेटाने हाकला. गेली ३५ वर्षे वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करून त्यांनी जगण्याची लढाई समर्थपणे लढली आहे.
-प्रतिनिधी

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या मेहरुन मुल्ला गेली ३५ वर्षे फुलेवाडी, टेंबलाई मंदिर येथे वृत्तपत्रे विक्रीचा व्यवसाय करतात. ऊन, वारा अथवा पाऊस असो सकाळी पाच वाजल्यापासून त्यांचे काम सुरू होते. या व्यवसायाच्या जीवावर त्या संपूर्ण कुटुंब चालवतात. त्यांच्या पतीचे अचानक अपघाती निधन झाले. पतीच्या निधनानंतर खचून न जाता परिस्थितीवर मात करत जिद्दीने गेली २० वर्षे त्यांनी स्वतःच्या तीन मुलांचा चरितार्थ या व्यवसायावर केला. आज त्यांची तिन्ही मुले अंबाई टॅंक, फुलेवाडी, बलराम कॉलनी परिसरामध्ये वर्तमानपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. सुना, नातवंडांत रमताना आपल्या व्यवसायाची त्यांनी घडी बसविली आहे.
आज (गुरुवार, ता. १२) त्या ६१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. एका महिलेने धाडसाने आणि आत्मविश्वासाने वृत्तपत्र विक्रेत्या व्यवसायामध्ये गेली पस्तीस वर्षे काम करून कुटुंबांचा चरितार्थ चालवून समाजापुढे एक नवीन अध्याय ठेवला आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57304 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top