आखरी रास्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आखरी रास्ता
आखरी रास्ता

आखरी रास्ता

sakal_logo
By

21173

मनपा प्रशासनाचा सुखद धक्का
आंदोलनांच्या इशाऱ्यापूर्वी कामाला केली सुरुवात; आखरी रास्ता कृती समितीतर्फे सत्कार
कोल्हापूर, ता. ११ ः गंगावेश ते शिवाजी पूल रस्त्यावरील ड्रेनेजच्या झाकणांमुळे होणारे अपघात तसेच रखडलेल्या कामाबाबत आखरी रास्ता कृती समिती आंदोलनाचा इशारा देण्यासाठी येण्यापूर्वीच प्रशासकांनी अधिकाऱ्यांना आदेश देऊन कामाला सुरूवात केली. या सुखद धक्क्यामुळे समितीने आंदोलनाचे एक पाऊल मागे घेतले.
ड्रेनेजची झाकणे नवीन रस्त्यात खाली गेल्याने दोन दिवसांपूर्वीच झालेल्या अपघातात एक वृद्धा गंभीर जखमी झाली. चांगला रस्ता झाल्याने वाहने भरधाव जाऊन ड्रेनेजचा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात अपघात होत होते. गंगावेशमधील अर्बन बँक ते दत्त मंदिर, काजवे बिल्डिंग हा रस्ता दुरवस्थेत असून, त्याच्या दुरुस्तीसाठी कृती समितीने वर्षापूर्वी निवेदन दिले होते. त्यावेळी प्रशासकांनी रस्त्याची पाहणी करून हा रस्ता लवकर करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते; पण हे काम रखडले होते. यासाठी प्रशासकांना निवेदन देण्यासाठी आज कृती समिती येणार असल्याचे किशोर घाटगे यांनी प्रशासकांना कळवले. त्यानंतर प्रशासकांनी तातडीने शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, कार्यकारी अभियंता नारायण भोसले यांना सूचना दिल्या. त्वरित कृती समितीशी संपर्क साधून कामाला सुरुवात करण्यास सांगितले. प्रशासकांकडून दाखवलेल्या या तत्परतेने कृती समितीनेही आंदोलनाचे एक पाऊल मागे घेतले. तसेच या तत्परतेचे कौतुक करण्याचा निर्णय घेत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह अधिकाऱ्यांचा प्रतिनिधीक सत्कार केला. यावेळी कृती समितीचे रियाज बागवान, सनी अतिग्रे, महेश कामत, संदीप सासणे, आर. एन. जाधव, अमर जाधव, सतीश कोरवी, रवी घोलपे, सलमान बागवान, किशोर माने आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57305 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top