
Gag111_txt.txt
लोगो- पारगावकरवाडी प्रीमियर लीग
-
21181
अंतिम सामना जिंकणारा गगनबावडा संघपारगावकरवाडी प्रीमियर लीग
-
गगनबावडा संघाला विजेतेपद
गगनबावडा, ता. ११ ः कै. सिताराम उर्फ बाबू धरमले व कै. संजय पारगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पारगावकर वाडी प्रीमियर लीग २०२२ क्रिकेट स्पर्धा पारगावकर वाडी( सैतवडे) येथील मैदानावर झाल्या. वीस क्रिकेट संघानी भाग घेतला. सर्व सामने जिंकत गगनबावडा संघाने विजेतेपद पटकावले तर गारीवडे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मालिकावीर एकनाथ पाटील (गारीवडे संघ), उत्कृष्ट गोलंदाज महेंद्र पाटील (गगनबावडा संघ), सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून विजय पाडावे (गारीवडे संघ) यांची निवड करण्यात आली. गगनबावडा संघाकडे सुहास पांगळे, मयूर बिल्ले, महेंद्र पाटील, तर गारीवडे संघाकडे एकनाथ पाटील, विजय पाडावे असे खेळाडू असल्याने अपेक्षेप्रमाणे अंतिम सामना अत्यंत चुरशीने खेळला गेला; पण गगनबावडाच्या पांगळेने सुंदर फलंदाजी करत संघास विजय मिळवून दिला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57312 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..