
पोलिस सोसायटीतर्फे कार्यक्रम
21179
कोल्हापूर : नंदकुमार सिद यांच्या वारसांना विमा धनादेश प्रदान करताना पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, अरुण काकडे, किरण पाटील, विजयसिंह गायकवाड आदी.
पोलिस सोसायटीतर्फे वारसास विमा धनादेश प्रदान
कोल्हापूर, ता. ११ : कोल्हापूर डिस्ट्रीक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटीमार्फत मयत सभासदाचे वारसास १५ लाख रुपयांचा विमा धनादेश प्रदान करण्यात आला. पोलिस अधिक्षक तथा संस्था पदसिद्ध अध्यक्ष शैलेश बलकवडे अध्यक्षस्थानी होते.
राष्ट्रपती पदक, पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त, पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती, सेवानिवृत्त, ज्येष्ठ सभासद, क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या सभासद, पाल्यांचा श्री. बलकवडे, विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक किरण पाटील यांच्या हस्ते सत्कार केला.
सभासद (कै.) नंदकुमार सिद यांच्या वारसाना संस्थेमार्फत कर्ज सुरक्षेसाठी उतरविलेल्या एस.बी.आय.लाईफ विम्याचा १५ लाख रुपयाचा धनादेश दिला. उपाध्यक्ष शिवराम पाटील यांनी प्रास्ताविक केले. संस्था अध्यक्ष दत्तात्रय दुर्गुळे यांनी आढावा घेतला. सीए सुनील नागावकर, एसबीआय विमा सल्लागार विजयसिंह गायकवाड, प्रा. एस. टी. जाधव, लेखा परिक्षक सतिश पाडळकर उपस्थित होते. संचालक विजय कोळी यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57314 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..