प्रभाग रचना शुक्रवारी होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभाग रचना शुक्रवारी होणार
प्रभाग रचना शुक्रवारी होणार

प्रभाग रचना शुक्रवारी होणार

sakal_logo
By

अंतिम प्रभाग रचना उद्या शक्य
किरकोळ त्रुटी दुरुस्त; निवडणूक आयोगाकडून आज मंजुरी
कोल्हापूर, ता. ११ ः महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना शुक्रवारी (ता. १३) जाहीर होण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाने यापूर्वीच प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली असून आज काही किरकोळ दुरुस्ती करून परिपूर्ण कागदपत्रे सोपवली आहेत. त्यामुळे आयोगाकडून त्याला गुरुवारी मंजुरी देऊन शुक्रवारी ती जाहीर होईल. सहा प्रभागांमध्ये काही किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे.
त्रिसदस्यीय प्रभागरचनेनुसार महापालिकेने हरकती मागवून सुनावणी होऊन अहवाल मार्चमध्ये आयोगाकडे सादर केला आहे. त्या दरम्यान राज्य शासनाने नवीन निर्णय घेतल्याने ही प्रक्रिया थांबली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने ती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिल्याने आयोगाने महापालिकेकडून आणखी माहिती घेतली. जुन्या रचनेत काही बदल झाले आहेत का याची माहिती घेतली. काही किरकोळ बदल केल्याने त्याबाबतची कागदपत्रे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून तपासून घेतली. तसेच ती आज अंतिम करून आयोगाकडे दिली आहेत. उद्या (ता. १२) आयोगाकडून अंतिम मंजुरी होऊन शुक्रवारी जाहीर केली जाणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
आयोगाकडून प्रभाग रचना निश्‍चित झाल्यानंतर मतदार यादीचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. त्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याने इच्छुकांनी अंदाज बांधून पुढील तयारी सुरू केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57324 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top