
शेट्टी यांची आजरा कारखान्याला भेट
शेट्टी यांची आजरा कारखान्याला भेट
आजरा, ता. ११ : नाबार्डकडून इतर क्षेत्रात कमी व्याजदराने कर्ज पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे अडचणीत असलेल्या कारखान्यांसाठी कर्जपुरवठा व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संसथापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
गवसे (ता. आजरा) येथील आजरा साखर कारखान्याला शेट्टी यांनी सदिच्छा भेट दिली व कामकाजाची माहिती घेतली. या वेळी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे अध्यक्षस्थानी होते. कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. तानाजी भोसले यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात ते म्हणाले, ‘‘आर्थिक अडचणीमुळे बंद असलेला कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळ तसेच कर्मचाऱ्यांनी योगदान दिले आहे. यंदाच्या हंगामात एफआरपी प्रमाणे २९०० रुपये दर दिला आहे. सुमारे साडेतीन लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. कारखानदारी समोरील अडचणी सोडविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी शेट्टींनी पुढाकार घ्यावा.’’
शेट्टी म्हणाले, ‘‘कारखान्यांना जिल्हा बॅंक व राज्य बॅंकेकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाचा व्याजदरही कमी असला पाहिजेत. नाबार्डकडून इतर क्षेत्रात कमी व्याजदराने कर्ज पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे अडचणीत असलेल्या कारखान्यांसाठी कर्जपुरवठा व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे.’’ राजेंद्र गड्ड्यान्नावर म्हणाले, ‘‘तालुक्यातील उचंगी, सर्फनाला हे पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झाल्यावर उसाचे क्षेत्र वाढेल. त्यामुळे कारखाना स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल.’’ या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी, संचालक मुकुंदराव देसाई, एम. के. देसाई, संचालिका अंजनाताई रेडेकर, तानाजी देसाई, व्ही. के. ज्योती., पी. आर. चव्हाण, एस. एन. व्हरकट उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57325 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..