निलजीत कुदळीने मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निलजीत कुदळीने मारहाण
निलजीत कुदळीने मारहाण

निलजीत कुदळीने मारहाण

sakal_logo
By

मुख्याध्यापक, मुलाला
कुदळीने केली मारहाण
निलजीत प्रकार; प्रबोधनात्मक ‘पोस्ट’चे निमित्त
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ११ : सोशल मीडियावर टाकलेल्या ‘पोस्ट’च्या वादातून निलजी (ता. गडहिंग्लज) येथे कुदळीने मारल्याने मुख्याध्यापकासह दोघे जखमी झाले. सुरेश हुली व त्यांचा मुलगा सौरभ हुली अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी गावातीलच शिवानंद स्वामी याच्याविरुद्ध पोलिसांत मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, सुरेश हुली मनवाड प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक आहेत. शाळेचा शतकमहोत्सव त्यांनी चांगल्या प्रकारे साजरा केला होता. तसाच सोहळा आपल्या गावातील शाळेचा व्हावा म्हणून त्यांनी गावातील काही प्रतिष्ठितांशी चर्चा सुरू केली होती. यासंदर्भात ‘आम्ही निलजीकर’ या सोशल मीडियावर प्रबोधनात्मक ‘पोस्ट’ही टाकली होती. याच दरम्यान मंदिरे का बांधावीत, याबाबतची ‘पोस्ट’ स्वामीने टाकली होती. यानंतर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हुली आपल्या घराकडे जाताना बाबू हुली यांच्या घरासमोर स्वामीने त्यांना ‘मास्तर तुम्हाला दाखवितो,’ अशी धमकी देऊन कुदळीने त्यांच्या डोकीत मारहाण केली. भांडण सोडवण्यास गेलेल्या सौरभच्या मांडीवरही कुदळीने मारहाण केली. यात पिता-पुत्र जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सौरभने पोलिसांत याबाबतची फिर्याद दिली. सोशल मीडियावरील ‘पोस्ट’च्या वादातून हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57326 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top