पालिका कर्मचाऱ्यांना साडेतीन कोटींचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिका कर्मचाऱ्यांना साडेतीन कोटींचे वाटप
पालिका कर्मचाऱ्यांना साडेतीन कोटींचे वाटप

पालिका कर्मचाऱ्यांना साडेतीन कोटींचे वाटप

sakal_logo
By

पालिका कर्मचाऱ्यांना
साडेतीन कोटींचे वाटप

इचलकरंजी, ता.११ ः राज्य शासनाकडून तब्बल ९८ कोटी रुपये थकीत सहायक अनुदान इचलकरंजी पालिकेला प्राप्त झाले होते. त्यातून पालिका कार्यरत व निवृत्त कर्मचाऱ्यांना तब्बल साडेतीन कोटी रुपयांचे वाटप केले. यामध्ये थकीत महागाई भत्त्याचा फरक व वैद्यकीय बिले अशा दोन बाबींची परिपूर्तता आज केली. पालिकेला दहमहा मिळणाऱ्या सहायक अनुदानात मोठी कपात झाली होती. त्याच्या फरकापोटी राज्य शासनाकडून तब्बल ९८ कोटी रुपये इचलकरंजी पालिकेला नुकतेच प्राप्त झाले होते. यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी विशेष प्रयत्न केले होते. या अनुदानातून पालिका कर्मचाऱ्यांची सर्व प्रकारची देणी आदा करण्याच्या सूचना नगरपरिषद संचलनालयाने दिल्या होत्या. त्यानुसार कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देयदेणी याची एकत्रीत माहिती काढण्याचे काम सुरू होते. याबाबत आज कर्मचाऱ्यांना थकीत महागाई भत्त्याचा फरक सुमारे तीन कोटी रुपये व वर्षभरापासून थकलेली वैद्यकीय बिलांची सुमारे ५० लाखांची देणी आदा केली. त्याचे वाटप मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते केले. माजी नगरसेवक रवींद्र माने, उपमुख्याधिकारी केतन गुजर, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57327 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top