
लाक्षणिक उपोषण
21191
कोल्हापूर ः सहायक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करताना कर्मचारी.
राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी
संघटनेतर्फे लाक्षणिक उपोषण
कोल्हापूर, ता. ११ : पदोन्नती आणि आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेतर्फे सहायक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सप्टेंबर २०२१ मध्ये शासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार आरोग्य सेवकाला पदोनतीसाठी विज्ञान शाखेचा पदवीधर असणे आवश्यक असावे या जाचक अटीमुळे राज्यातील हिवताप कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित रहावे लागले आहे. या अधिसूचनेमुळे आश्वासित योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. यामुळे राज्यातील हिवताप कर्मचाऱ्यामध्ये असंतोष आहे. हा प्रश्न तत्काळ सोडवला नाही तर राज्यभर मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा राज्याध्यक्ष बाजीराव कांबळे, सचिव पी. एन. काळे यांनी दिला. या आंदोलनास कोल्हापूर सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचारी उपस्थित होते. राकेश घोडके, सुधीर खाडे, वड्ड, सूरज नेतले, बजरंग शिंदे, दिनकर कुंभार, बाजीराव चौगले, जे. के. कांबळे आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57334 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..