कर्मचाऱ्यांचा संप स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मचाऱ्यांचा संप स्थगित
कर्मचाऱ्यांचा संप स्थगित

कर्मचाऱ्यांचा संप स्थगित

sakal_logo
By

महापालिका कर्मचाऱ्यांचा
संप ३० जूनपर्यंत स्थगित
कोल्हापूर, ता. ११ ः महापालिका कर्मचारी संघाच्या मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याची प्रशासनाकडून दिलेली हमी तसेच त्याकरिता तत्काळ उचलली जात असलेली पाऊले यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांचा संप ३० जूनपर्यंत स्थगित केला आहे. संघाने १३ मे पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता.
संघाने दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. आर्थिक मागण्या मान्य करण्यात आल्या. कर्मचाऱ्यांना सुविधा व साहित्य पुरवण्याचे मान्य करण्यात आले. रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न तसेच कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक अशा दीडशेवर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी आढावा घेऊन पात्र कर्मचाऱ्यांना बढती देण्याचे आश्‍वासन दिले आहे. तसेच प्रलंबित मागण्यांबाबत तत्काळ तोडगा काढण्याच्यादृष्टीने पाऊले उचलली आहेत. तसेच काही प्रश्‍नांबाबत अवधी मिळावा यासाठी प्रशासनाने केलेल्या विनंतीनुसार संपाचा निर्णय ३० जूनपर्यंत स्थगित करण्याचे संघाने ठरवले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57347 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top