विज्ञान प्रदर्शन बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विज्ञान प्रदर्शन बातमी
विज्ञान प्रदर्शन बातमी

विज्ञान प्रदर्शन बातमी

sakal_logo
By

लोगो
लोकराजा राजर्षी शाहू कृतज्ञता

विद्यार्थ्यांच्या सृजनशील आविष्काराला प्रोत्साहन
विज्ञान प्रदर्शन; लेझर बीम प्रोटेक्शनसह पाण्याचा अपव्यय टाळण्यावर भाष्य
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या प्रयोगशील कल्पनांना चालना मिळण्याबरोबरच त्यांच्या सृजनशील आविष्काराला प्रोत्साहन मिळाले, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, विज्ञान-तंत्रज्ञानाची ओढ रुजावी, या भावनेतूनच लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी पर्वानिमित्त शाहू मिल येथे विज्ञान प्रदर्शन आयोजिले आहे. जिल्हास्तरावरील प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प पाहता विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची रुची निर्माण झाल्याचे अधोरेखित होते. विज्ञान प्रदर्शनातून वैज्ञानिक सिद्धांत, उपयुक्त उपकरणे, शोध आणि प्रतिकृती अशा सृजनशील आविष्काराला प्रोत्साहन मिळाले असल्याबाबत विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले. ‘लोककल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ हा विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय होता. शालेय विद्यार्थ्यांनी व शाळांनी विविध प्रकारची उपकरणे तयार करून विज्ञान प्रदर्शनात मांडली. ही उपकरणे पाहून पालक, विद्यार्थी व उपस्थित भारावून गेले.
वाहतुकीचे नियम धुडकावून अतिवेगाने गाडी चालवली जाते, याबाबत वाहतूक नियंत्रण करण्यासाठी ‘लेझर बीम प्रोटेक्शन’ उपकरण, तर शहापूर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अलमट्टी धरणाची प्रतिकृती मांडली. कोल्हापुरातील छत्रपती शाहू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पूरनियंत्रण शाश्वत विकास व महापूर नियंत्रण प्रकल्प सादर केला. शिरोळच्या पद्माराजे विद्यालयाने अंडरग्राउंड वॉटर ड्रेनेज सिस्टिम अँड ऑटोमॅटिक इरिगेशन प्रकल्प मांडला. व्हन्नूर येथल दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयाने अंध व्यक्तीची काठी प्रकल्प सादर केला. पाण्याचा अपव्यय टाळणे हा प्रकल्प माध्यमिक विद्यालय, सावर्डे सडोली खालसा शाळेच्या विद्यार्थ्यांनी मांडला. विठ्ठल पाटील माध्यमिक विद्यालयाने रेल्वे ट्रॅकवरील वाहतूक व्यवस्था हा प्रकल्प मांडला. कुमारी मालती मोहनलाल दोशी हायस्कूल, वळीवडेच्या विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेचा वापर करून आधुनिक शेती पद्धती व पाणी वाहतूक प्रभावी नियंत्रण विषय प्रदर्शनात मांडला. श्री सरस्वती हायस्कूल, टाकळीवाडीने आरोग्यपूर्ण जीवनशैली, किसनराव मोरे हायस्कूल ज्युनिअर कॉलेज सरवडेने स्मार्ट ई-व्हेईकल, ताराबाई अण्णासाहेब नरदे हायस्कूल नांदणीने जलसुरक्षेचे शाश्वत मार्ग, कौतुक विद्यालय पुलाची शिरोलीने अपघात टाळणारा गॉगल, कुमार भवन कडगाव या शाळेने उंदरावरील जैविक नियंत्रक आणि न्यू इंग्लिश स्कूल नूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी घरगुती वेल्डिंग मशिन हा वैज्ञानिक प्रयोग विज्ञान प्रदर्शनात मांडला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57353 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top