महाकाली पालखी सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाकाली पालखी सोहळा
महाकाली पालखी सोहळा

महाकाली पालखी सोहळा

sakal_logo
By

२१२०८

महाकाली पालखी सोहळा उत्साहात
भांगडा नृत्य मिरवणुकीचे आकर्षण; शाहू महाराजांचा सजीव देखावाही
कोल्हापूर, ता. ११ ः शिवाजी पेठेतील महाकाली मंदिरात पालखी सोहळा उत्साहात झाला. पंजाबी पारंपरिक भांगडा नृत्‍य हे मिरवणुकीचे आकर्षण होते. त्‍यासोबतच मुलींचे लेझीम पथक, साऊंड सिस्‍टीम, राजर्षी शाहू महाराजांच्‍या कृतज्ञता पर्वानिमित्त बग्‍गीमधून निघालेल्‍या शाहू महाराजांचा सजीव देखावाही मिरवणुकीत साकारण्यात आला.
अक्षय्‍य तृतीयेपासून महाकाली देवीचा उत्‍सव सुरू होतो. सोमवारी दुर्गाष्‍टमीदिवशी महाकालीचा नवचंडी यज्ञ व महाप्रसाद झाला. सूर्येश्‍वर मंदिर, राजघाट रोड, चौपाटी मित्र मंडळ, ताराबाई रोड, साकोली कॉर्नर मार्गे पालखी मिरवणूक झाली. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची आरास करण्‍यात आली होती. तसेच सरबत, दूध व प्रसादाचे भाविकांना वाटप करण्‍यात आले. पालखी मिरवणुकीनंतर आतषबाजी करण्‍यात आली. उत्‍सवानिमित्त महाकालीदेवीची गजारूढ रुपात पूजा बांधण्‍यात आली. पूजा व धार्मिक विधी पिंटू गुरव, ओंकार गुरव, संकेत गुरव यांनी केले. रात्री पालखी मंदिरात आल्‍यानंतर देवीचा गोंधळ पार पडला. यावेळी मानकरी गुलाबराव सरनाईक, संदीप सरनाईक आदी उपस्‍थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57357 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top