डी.वाय.पाटील कॉलेज बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डी.वाय.पाटील कॉलेज बातमी
डी.वाय.पाटील कॉलेज बातमी

डी.वाय.पाटील कॉलेज बातमी

sakal_logo
By

२१२११

‘एल्सवेअर’च्या यादीत
डॉ. लोखंडे देशात अव्वल
मटेरियल सायन्समध्ये मोलाचे संशोधन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठातील रिसर्च डिरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांनी मटेरियल सायन्स संशोधनामध्ये देशात तिसरे स्थान मिळविले. ‘एल्सवेअर’ या जगप्रसिद्ध प्रकाशनगृहाने अलीकडेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संशोधकांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत भारतरत्न प्रा. सी. एन. राव यांनी प्रथम स्थान मिळवले आहे.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, जीवशास्त्र, धातुविज्ञान, खनिजशास्त्र आणि अभियांत्रिकी या विषयांचा एकत्रित अभ्यास मटेरियल सायन्समध्ये केला जातो. याचा वापर करून नवीन घनपदार्थांची निर्मिती, त्यांचा गुणअभ्यास व त्यांची उपयोगिता तपासणे तसेच वापरात असलेल्या पदार्थाचे गुणधर्म बदलून त्याचा विविध क्षेत्रात वापर करणे शक्य आहे. प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांनी अनेक नवनवीन पदार्थांची निर्मिती व त्यांचा वापर गॅस सेन्सार, सुपरकॅपॅसिटर, सौरघटमध्ये केला आहे. मटेरियल सायन्स संशोधनातील स्थान निश्चितीसाठी जगभरातील एक लाख शास्त्रज्ञांचा डाटाबेस तयार केला आहे. त्यासाठी सायटेशन, एच इंडेक्स, प्रकाशित केलेल्या शोधनिबंधांचा दर्जा इ. निकषांचा वापर केला आहे. त्यामधून पहिल्या दोन टक्के शास्त्रज्ञांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. डॉ. लोखंडे यांनी देशभरातील संशोधकांच्या यादीत प्रथम तीन मध्ये स्थान मिळवल्याबद्दल विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष गृहराज्य मंत्री सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, प्रकुलगुरू डॉ. शिंपा शर्मा व कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक डॉ. अजितसिंह जाधव यांनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57364 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top