रोटावेटर मध्ये अडकून शेतकरी गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटावेटर मध्ये अडकून शेतकरी गंभीर
रोटावेटर मध्ये अडकून शेतकरी गंभीर

रोटावेटर मध्ये अडकून शेतकरी गंभीर

sakal_logo
By

21213

रोटावेटरमध्ये अडकून
शेतकरी गंभीर जखमी
तिटवेतील घटना; हातात रुतलेला फणा काढण्यात यश
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः तिटवे (ता. राधानगरी) येथे रोटावेटर साफ करताना फण्यात अडकून शेतकरी गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी धाव घेतल्याने त्याचा जीव वाचला. प्रवीण श्रीपती पवार असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्याला रोटावेटरमधून सोडवून सीपीआरमध्ये दाखल केले. हातात आरपार रुतलेला लोखंडी फणा काढण्यात सीपीआरच्या डॉक्टरांना यश आले.
पोलिसांकडून आणि शेतकऱ्याने सांगितले, तिटवे येथील प्रवीण पवार शेती करतात. शेतात भरणी सुरू असताना रोटरची स्वच्छता सुरू असताना अचानक गिअर पडला आणि रोटरमधील एक स्टीलचा फणा हातात घुसला. यानंतरही रोटावेटर सुरूच होता. जखमी पवार यांनी प्रसंगावधान राखून रोटर चालू असतानाच डाव्या हातांनी तो थांबविला. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
रोटावेटरमध्ये साचलेली घाण काढताना रोटावेटर सुरू झाल्यामुळे ही घटना घडली. गावातील बाळू देसाई, शिवाजी पवार, विक्रम घारे, अरुण पवार, रामदास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत प्रवीण यांना रोटावेटर खालून सुरक्षितरित्या बाहेर काढले. हातात रुतलेल्या फण्यासह सीपीआरमध्ये त्यांच्यावर तातडीन उपचार केले. हातात रुतलेली रोटावेटरची नांगी काढण्यात डॉ. अक्षय पुंडकर यांना यश आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57366 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top