
नाले सफाई
नाल्यांचे सफाईचे ६० टक्के काम पूर्ण
कोल्हापूर, ता. ११ : शहरामध्ये महापालिकेच्या वतीने केल्या जात असलेल्या नालेसफाईतून आजअखेर १०७७ टन गाळ काढला. लहान-मोठ्या नाल्यांचे सफाईचे ६० टक्के काम पूर्ण झाले. १७ मार्चपासून गाळ काढण्याच्या कामास सुरवात झाली आहे.
पोकलॅन्ड मशिनद्वारे एन.टी.सरनाईकनगर ते कात्यायनी कॉम्प्लेक्स, एन.टी.सरनाईकनगर ते महालक्ष्मी हॉस्पिटल, रामानंदनगर ते महालक्ष्मी हॉस्पिटल, रामानंदरनगर ते जरगनगर शाळेच्या पाठीमागील बाजूपर्यंत, भारतनगर ते आर. के. नगर, मनोरा हॉटेल ते वर्षानगर, भारतनगर ते मनोरा हॉटेल, हॉकी स्टेडियम ते रेणुका मंदिर, रिलायन्स मॉल ते स्वयंभू मंदिर, लक्ष्मीपुरी ते रिलायन्स मॉल मागील बाजू व रामानंदनगर येथील ॲग्रीकल्चर बंधारा या परिसरात गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले. जेसीबीद्वारे शुगर मिल, हनुमान तलाव, पोलिसलाईन, सदर बाजार, आंबेडकरनगर, शाहूपुरी, कनाननगर, गाडी अड्डा, मंडलिक वसाहत, दुधाळी, संभाजीनगर, ६९० कामगारचाळ, रामानंदनगर, साळोखेनगर, कात्यायनी कॉम्प्लेक्स, सुर्वेनगर, कणेरकरनगर व क्रांतिसिंह नाना पाटीलनगर या परिसरातील ८० कच्च्या चाचींची सफाई करण्यात आली. ६० सफाई कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने शुगर मिल, कसबा बावडा पूर्व, हनुमान तलाव, लाईन बझार, लक्ष्मीविलास पॅलेस, पोलिसलाईन, सर्किट हाऊस, भोसलेवाडी, कदमवाडी, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, आंबेडकरनगर, शासकीय मध्यवर्ती कारागृह, रायगड कॉलनी, कणेरकरनगर, सुर्वेनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, सदर बाजार, व्रिकमनगर, टेंबलाईवाडी, सिद्धार्थनगर, शाहूपुरी, राजारामपुरी मातंग वसाहत, राजेंद्रनगर, साळोखेनगर, साने गुरुजी वसाहत, साईक्स एक्स्टेंशन, वारे वसाहत, चंद्रेश्वर, फिरंगाई, ६९० कामगार चाळ, सुभाषनगर, वर्षानगर, टेंबलाईवाडी, प्रगती कॉलनी, तपोवन, अंबाई टँक परिसर या ४४ प्रभागांमध्ये २६५ गटर चॅनेलची सफाई केली. सहायक आयुक्त संदीप घार्गे यांनी पाहणी केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57371 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..