चोरी उघडकीस एकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरी उघडकीस एकास अटक
चोरी उघडकीस एकास अटक

चोरी उघडकीस एकास अटक

sakal_logo
By

२१२१४

सराफी दुकानातील चोरीचा छडा
संशयित राजारामपुरीतील; बनावट चावीचा वापर; ४४ तोळे दागिने हस्तगत

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः शाहूपुरी व्यापारपेठेत बनावट चावीने सराफ दुकानात चोरी करणाऱ्या तरुणास पोलिसांनी आज अटक केली. प्रशांत महिपराव पाटील (वय ४७, राजारामपुरी ११वी गल्ली) असे त्याचे नाव आहे. चोरटा प्रशांत याने चोरी केलेल्या ५६ तोळे दागिण्यांपैकी सुमारे ४४.३ तोळे दागिणे घरी ठेवले होते. पोलिसांनी ते आज जप्त केल्याची माहिती रात्री दिली. त्याच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकलही जप्त केली. चोरी उघडकीस येवू नये म्हणून त्याने दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआरही चोरला होता. मात्र इतरांच्या सीसीटीव्हीमुळे तो जाळ्यात अडकला.
पोलिसांनी सांगितले, टाकाळा परिसरातील रणजीत पारेख (सरलष्कर भवन, जोतिबा रोड) यांचे रणजीत एंटरप्राईजेस हे सराफ दुकान आहे. रविवारी (ता. ८) रात्री त्यांनी दुकान बंद केले. सोमवारी (ता. ९) सकाळी दुकानाच्या शटरचे कुलूप चोरट्याने बनावट चावीने उघडून सुमारे २६ लाखांचे ५६ तोळे दागिने पळविले. त्याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
निरीक्षक राजेश गवळी यांनी तपासासाठी विशेष पथके नेमली. शोरूमचे कुलूप काढण्यासाठी बनावट चावीचा वापर केल्याचे निदर्शनास आले. यामुळे दुकानाची माहिती असणारी व्यक्तीच या मागे असण्याची शक्यता व्यक्त केली. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे गायब केल्याने चोरट्याला दुकानाची माहिती असावी, यावर पोलिस ठाम राहिले. आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले. दुकानातील सर्वांची चौकशी केली. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रणजित यांचा मित्र असलेल्या प्रशांतवर संशय व्यक्त केला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. अखेर प्रशांतने चोरीची कबुली दिली. चोरी उघडकीस येऊ नये म्हणून शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर चोरला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57379 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top