तलवार हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलवार हल्ला
तलवार हल्ला

तलवार हल्ला

sakal_logo
By

तलवार हल्ल्यात
मोरेवाडीत तरुण जखमी
किरकोळ वाद; चौघांवर गुन्हा दाखल
कोल्हापूर, ता. ११ ः फोनवरून बाहेर बोलावून शिव्या देऊन एकास तलवारीने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी रात्री आर. के. नगर परिसरातील मोरेवाडी येथे ही घटना घडली. या प्रकरणी जखमी अभय बाळासाहेब मोरे यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यानुसार पोलिसांनी अण्णा मोरे, रोहित मोरे, बंटी मोरे, भरत मोरे (सर्व रा. आर. के. नगर, मोरेवाडी परिसर) यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली. याबाबतची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.
पोलिसांनी सांगितले, जखमी मोरे आणि संशयित आरोपी मोरे हे शेजारी आहेत. काल रात्री अण्णा मोरे याने जखमी अभय मोरे यांना फोन करून घराबाहेर बोलावून घेतले. कोणतेही कारण नसताना त्यांना शिव्या देऊन डोक्यात तलवारीने वार केला. यावेळी रोहित मोरे, बंटी मोरे आणि भरत मोरे यांनी शिव्या देऊन धक्काबुक्की केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57380 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top