बेळगुंदी केंद्रशाळेसाठी ठेव, ‘गेट-टुगेदर’च्या खर्चाला फाटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगुंदी केंद्रशाळेसाठी ठेव, ‘गेट-टुगेदर’च्या खर्चाला फाटा
बेळगुंदी केंद्रशाळेसाठी ठेव, ‘गेट-टुगेदर’च्या खर्चाला फाटा

बेळगुंदी केंद्रशाळेसाठी ठेव, ‘गेट-टुगेदर’च्या खर्चाला फाटा

sakal_logo
By

21215
बेळगुंदी : महाराष्ट्र हायस्कूलच्या १९९७-९८ सालच्या माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात बेळगुंदी केंद्रशाळेसाठी यशवंत ठेव पावतीचे वितरण करताना शिवाजी पन्हाळकर.

बेळगुंदी केंद्रशाळेसाठी ठेव
‘गेट-टुगेदर’च्या खर्चाला फाटा; ‘अत्याळ’च्या माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील महाराष्ट्र हायस्कूलच्या १९९७-९८ सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा अनोखा गेट-टुगेदर झाला. अवाजवी खर्चाला फाटा देत शेजारच्या बेळगुंदी (ता. गडहिंग्लज) गावातील केंद्रशाळेच्या (प्राथमिक शाळा) नावावर ३० हजार रुपयांची यशवंत ठेव ठेवली. या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र हायस्कूलचे १९९७-९८ सालचे माजी विद्यार्थी पाच वर्षांपूर्वी पहिल्यांदा एकत्र आले. प्रत्येकाने स्वेच्छेने दिलेल्या देणगीतून गावातील एका आई-वडील गमावलेल्या विद्यार्थिनीच्या नावावर ३० हजारांची यशवंत ठेव ठेवली होती. दुसऱ्या वर्षी अत्याळच्या महात्मा फुले विद्या मंदिर या प्राथमिक शाळेच्या नावावर ५० हजारांची यशवंत ठेव ठेवली होती. तर गतवर्षी आजी विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण अशा शिदोरी उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमांत दर महिन्याला प्रत्येक बॅचच्या माजी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जात आहे.
दरम्यान, सन १९९७-९८ सालच्या माजी विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर बेळगुंदी येथील अजित पाडले या वर्गमित्राच्याच घरी साधेपणाने झाला. महाराष्ट्र हायस्कूलचे निवृत्त शिक्षक शिवाजी पन्हाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पन्हाळकर यांच्या हस्ते बेळगुंदी केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा लोखंडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शामल पोवार यांना ठेव पावतीचे वितरण झाले. महाराष्ट्र हायस्कूलमध्ये बेळगुंदी गावचेही विद्यार्थी शिकण्यास असल्याने केंद्रशाळेला ही देणगी दिली.
पन्हाळकर यांनी गेट-टुगेदरचा अनावश्यक खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांसाठी केल्या जात असलेल्या मदतीचे कौतुक केले. त्यानंतर झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या बैठकीत शिदोरी उपक्रमाचा आतापर्यंतचा आढावा घेण्यात आला. उपक्रमाबाबत माजी विद्यार्थ्यांनी काही सूचना मांडल्या. तसेच भविष्यात नवे उपक्रम राबविण्याबाबत चर्चा झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57395 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top