
शिवराज महाविद्यालयात करिअर महामेळावा
21308
गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयातील करिअर महामेळाव्यात बोलताना डॉ. परशराम पाटील. व्यासपीठावर डॉ. अनिल कुराडे, आदित्य शर्मा, अॅड. दिग्विजय कुराडे, प्रा. बिनादेवी कुराडे, डॉ. एस. एम. कदम आदी.
शिक्षणाला कौशल्याची जोड हवी
डॉ. परशराम पाटील; शिवराज महाविद्यालयात करिअर महामेळावा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : शिक्षणामुळे करिअर करण्याची संधी प्राप्त होत आहे. परंतु पारंपारिक शिक्षणाला आता कौशल्यपूर्ण ज्ञानाची जोड असेल तर करिअरची अधिक संधी आहे. पदवी, पदव्युतर शिक्षण घेताना अनेक कौशल्याचे ज्ञान विकसित करता येते. त्यातूनच करिअर घडेल, असा विश्वास स्टार्ट अप इंडियाचे सल्लागार व कृषी अर्थतज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केला.
येथील शिवराज महाविद्यालय आणि बंगळूरच्या अन अकॅडमीतर्पे आयोजित करिअर महामेळाव्यात ते बोलत होते. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम अध्यक्षस्थानी होते. अकॅडमीचे आदित्य शर्मा, शिवराजचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. पाटील म्हणाले, ‘‘सध्या अधिकाधिक माहिती असणारी व्यक्तीच करिअरला गवसणी घालू शकते. ज्ञानाचा भांडार वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली पाहिजे. भविष्यात आपणाला काय घडायचे आहे ते आताच ठरविले पाहिजे. पूर्वी करिअर घडविण्यासाठी मोठ्या शहरात जावे लागत असे. आता डिजीटल युगात याचे ज्ञान सर्वत्र उपलब्ध आहे. त्याचा लाभ घ्यावा.’’
शर्मा म्हणाले, ‘‘सामान्य कुटूंबातील तरुणही आज उच्च पदावर आहेत. ते केवळ मेहनतीमुळेच. समाजासाठी काही तरी करण्याची आपली जबाबदारी वाढली आहे. आज देशाला मोठ्या प्रमाणात सीएंची गरज असून त्यात करिअर घडविण्याची संधी आहे.’’
डॉ. कुराडे म्हणाले, ‘‘ग्रामीण विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी प्राप्त व्हावेत. बदलत्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासारखे अनेक क्षेत्र आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी व्यापक स्वरुपात हा महामेळावा घेतला.’’
प्राचार्य डॉ. कदम यांचेही भाषण झाले. या वेळी उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, प्रा. बिनादेवी कुराडे, मोहित शर्मा, प्रा. तानाजी चौगुले, सूर्यकांत नाईक, शिवाजी कोळी, प्रा. किशोर अदाटे, प्रा. के. एस. देसाई, गौरी शिंदे उपस्थित होते. डॉ. आनंदा कुंभार, प्रा. ए. के. मोरमारे, प्रा. नाझिया बोजगर यांनी सूत्रसंचालन केले. रोपाला पाणी घालून मेळाव्याचे उद्घाटन झाले. डॉ. सुधीर मुंज यांनी स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. महेश चौगुले यांनी करुन दिला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57497 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..