रवळनाथ, बसवेश्‍वर मंदिर वास्तूशांती पाटणेत उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रवळनाथ, बसवेश्‍वर मंदिर वास्तूशांती पाटणेत उत्साहात
रवळनाथ, बसवेश्‍वर मंदिर वास्तूशांती पाटणेत उत्साहात

रवळनाथ, बसवेश्‍वर मंदिर वास्तूशांती पाटणेत उत्साहात

sakal_logo
By

21309
पाटणे ः रवळनाथ व बसवेश्वर मंदिर वास्तूशांतीनिमित्त कलश मिरवणुकीत सहभागी झालेल्या सुहासिनी.

रवळनाथ, बसवेश्‍वर मंदिर
वास्तूशांती पाटणेत उत्साहात
चंदगड, ता. १२ ः पाटणे (ता. चंदगड) येथे श्री रवळनाथ व बसवेश्वर मंदिराचा संयुक्त वास्तूशांती सोहळा उत्साहात झाला. पाच दिवस चाललेल्या या कार्यक्रमात विविध धार्मिक विधी केले. कळसारोहणाच्या मुख्य विधीसाठी पंचक्रोशीतील भाविकांनी हजेरी लावली होती. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवरील पाटणे गावात विविध जाती-धर्मांचे नागरिक अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहतात. गावचे ग्रामदैवत श्री रवळनाथ व बसवेश्‍वर मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय झाला. लोकवर्गणीतून दोन्ही देवतांच्या स्वतंत्र देखण्या इमारत उभ्या राहिल्या. डॉ. विश्‍वनाथ पाटील, विठोबा गावडे, अशोक पाटील, राजेश कुलकर्णी, अपय्या स्वामी यांच्या मार्गदर्शनाने वास्तूशांतीचे विविध विधी पार पडले. बेळगाव मुक्तीमठ येथील श्री श्री श्री सोमसिद्धेश्वर भूतरामहट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत कळसारोहण करण्यात आले. या दिवशी माहेरवाशिणींनी देवतांची ओटी भरण्याचा विधी पार पाडला. आमदार राजेश पाटील, माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, अॅड. अनंत कांबळे, विलास पाटील, जे. बी. पाटील यांसह पंचक्रोशीतील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57502 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top