
महात्मा फुले विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
21310
मजरे-कारवे ः महात्मा फुले विद्यालयाचे १९९८ च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी शिक्षकांसमवेत.
महात्मा फुले विद्यालयाच्या
माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १२ ः सोशल मीडियामुळे विविध कारणांनी दूर गेलेली माणसे जवळ येत आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून दहावीपर्यंत एकत्र शिकलेल्या विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार होत आहेत. त्यातूनच वर्षातून एखाद्या दिवशी त्यांचे स्नेहमेळावे होत आहेत. त्यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळून एक प्रकारचे समाधानही मिळत असल्याचे मत निवृत्त प्राचार्य एस. बी. पाटील यांनी व्यक्त केले. मजरे-कारवे (ता. चंदगड) येथील १९९८ च्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. प्राचार्य एम. एम. गावडे अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभी सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. निंगाप्पा बोकडे यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक एम. एल. कांबळे यांनी चोवीस वर्षांनंतर विद्यार्थ्यांनी जाणीव ठेवून शिक्षकांचा सत्कार केल्याबद्दल भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली. विद्यार्थी-शिक्षकांतील या नात्यांमुळे दोन्ही घटकांवरील कर्तव्याची जबाबदारी वाढत असल्याचे सांगितले. कमल पाटील, जे. जी. नांदवडेकर, निवृत्त प्राचार्य एन. एल. जाधव, प्रा. पी. आर. बसरीकट्टी, व्ही. एन. कांबळे, एस. एच. शेख, जी. पी. वरपे यांचे सत्कार झाले. डॉ. सागर पाटील, वर्षा कणगुटकर, डॉ. वंदना बसरीकट्टी यांनी तत्कालीन शैक्षणिक आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, विद्यार्थ्यांनी सत्कारमूर्तींसाठी ६० आंब्याची रोपे आणली होती. ती शाळेच्या आवारात लावावी, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली. त्यानुसार जून महिन्यात ही झाडे लावण्याचे ठरले. प्रा. परसू गावडे यांनी सूत्रसंचालन केले. कमल हलगेकर यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57503 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..