देशात ७५ ग्राहक सेवा मार्गदर्शन केंद्र ः डॉ. विजय लाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशात ७५ ग्राहक सेवा मार्गदर्शन केंद्र ः डॉ. विजय लाड
देशात ७५ ग्राहक सेवा मार्गदर्शन केंद्र ः डॉ. विजय लाड

देशात ७५ ग्राहक सेवा मार्गदर्शन केंद्र ः डॉ. विजय लाड

sakal_logo
By

21327
गडहिंग्लज : ग्राहक पंचायतीच्या कार्यक्रमात बोलताना डॉ. विजय लाड. शेजारी बी. जे. पाटील, सुधाकर भदरगे, सुरेश माने, तुकाराम गडकरी, उदय इंदूलकर आदी.

देशात ७५ ग्राहक सेवा मार्गदर्शन केंद्र
डॉ. विजय लाड; गडहिंग्लजला ग्राहक पंचायतीचा कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशात ७५ ग्राहक सेवा मार्गदर्शन केंद्र उभारण्याचा संकल्प राज्य ग्राहक पंचायतीने केला असून लवकरच हा संकल्प पूर्ण होईल, असे प्रतिपादन राज्याध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी केले.
येथील कला अकादमीच्या सभागृहात आयोजित ग्राहक पंचायतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष बी. जे. पाटील, उपाध्यक्ष सुधाकर भदरगे, संघटक सुरेश माने, सचिव दादासाहेब शेलार, तुकाराम गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. लाड म्हणाले, ‘‘कोल्हापूर जिल्ह्यात ग्राहक पंचायतीचे काम चांगले आहे. शाहू महाराज, स्वामी विवेकानंद व ग्राहकतीर्थ नानांचे कार्य पुढे न्यायचे आहे. प्रत्येक ठिकाणी ग्राहकांची फसवणूक सुरू आहे; मात्र अजूनही ग्राहक सजग झालेला नाही. आपले कर्तव्य काय आहे, याची माहिती त्यांना नाही. ग्राहकांना योग्य किमतीत वस्तू मिळावी व अन्याय होऊ नये यासाठी उत्पादन वाढ, वितरण समानता, उपभोगावर संयम या त्रिसूत्रीचा वापर करावा.’’
ग्राहकांना न्याय मिळवून देणे हे कर्तव्य समजून ग्राहक हक्कासाठी तन, मन, धनाने सर्वांनी काम करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष पाटील यांनी केले. गडकरी यांनी समाजासह ग्राहक प्रबोधनाचे काम करण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज व्यक्त केली. भदरगे, सुरेश माने यांचेही भाषण झाले. अ‍ॅड. विवेक पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. निकम यांनी आभार मानले. यावेळी उदय इंदूलकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57506 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top