रणजित देसाई यांच्या वास्तूला महागांवच्या विद्यार्थ्यांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रणजित देसाई यांच्या वास्तूला महागांवच्या विद्यार्थ्यांची भेट
रणजित देसाई यांच्या वास्तूला महागांवच्या विद्यार्थ्यांची भेट

रणजित देसाई यांच्या वास्तूला महागांवच्या विद्यार्थ्यांची भेट

sakal_logo
By

21328
कोवाड : जेष्ठ साहित्यिक रणजित देसाई यांच्या साहित्याची माहिती घेताना महागाव येथील राजा शिवछत्रपती महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक.

रणजित देसाई यांच्या वास्तूला
महागावच्या विद्यार्थ्यांची भेट
कोवाड, ता. १२ : येथे ज्येष्ठ साहित्यिक स्वामीकार रणजित देसाई यांच्या कोवाड येथील प्रभूछाया वास्तूला महागाव (ता. गडहिंग्लज) येथील राजा शिवछत्रपती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन साहित्याची माहिती घेतली.
मराठी विभागप्रमुख प्रा. एन. आर. पाटील व डॉ. सुकुमार आवळे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांची लेखक रणजित देसाई यांच्या साहित्याचा अभ्यास या विषयांतर्गत अभ्यास भेट आयोजित केली होती. विद्यार्थ्यांना रणजित देसाई यांचा जीवनपट त्यांचा साहित्यिक प्रवास, त्यांचे लेखन साहित्य व विविध कादंबऱ्यांतून रेखाटलेले प्रसंग पाहता आले.
प्रभूछाया इमरतीतील त्यांच्या पाउलखुणा, दुर्मिळ वस्तू, राजकीय व साहित्य क्षेत्रातील दिग्‌जांची पत्रे, त्यांचे फोटो, प्रशस्त ग्रंथालय, अभ्यासिका, बालगंधर्वांबरोबर झालेल्या रंगीताच्या मैफली अशा विविध प्रसंगांचे हुबेहुब रेखाटलेले चित्रण पाहून विद्यार्थी भाराऊन गेले. माझा गाव कादंबऱ्यातील जिवंत घटना व पात्रे यांचे प्रत्यक्षात दर्शन होत असल्याने त्यांचे साहित्य किती अजरामर आहे, याची प्रचिती येते. अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. रणजित देसाई यांच्या कन्या पारू नाईक यांची विद्यार्थ्यांनी भेट घेऊन दादांच्या साहित्य प्रवासाची माहिती घेतली. हस्तलिखितांची माहिती करून घेतली. काही मौलिक आठवणी व प्रसंग त्यांच्याकडून जाणून घेतले. ग्रंथपाल विष्णू पाटील, मारुती व्हन्याळकर यांनी ग्रंथालय व वाड्याची माहिती दिली. प्राचार्य डॉ. निवास जाधव, संस्थाध्यक्ष बाळासाहेब कुपेकर यांनी अभ्यास भेटीसाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57507 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top