‘कष्टकरी शेतमजुर’चे ठिय्या आंदोलन मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कष्टकरी शेतमजुर’चे ठिय्या आंदोलन मागे
‘कष्टकरी शेतमजुर’चे ठिय्या आंदोलन मागे

‘कष्टकरी शेतमजुर’चे ठिय्या आंदोलन मागे

sakal_logo
By

21329
--------
‘कष्टकरी शेतमजूर’चे ठिय्या आंदोलन मागे
इचलकरंजी, ता. १२ ः येथील प्रांताधिकारी कार्यालय परिसरात सुरू असलेले महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेचे ठिय्या आंदोलन गुरुवारी मागे घेतले. आंदोलकांच्या अधिकतर मागण्या मान्य केल्याने आंदोलन मागे घेत असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. शिरस्तेदर संजय काटकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. महिलेस सरबत देत उपोषण स्थगित केले. तसेच, अन्य बँकेत जमा झालेली पेन्शन लाभार्थ्यांकडे सुपूर्द करीत अशा समस्या उद्‍भवल्यास तत्काळ कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेने शिरोळ तालुक्यातील २१ हजार ९०० पेन्शनधारकांच्या विविध समस्यांबाबत प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर सोमवारपासून (ता. ९) ठिय्या आंदोलन सुरू केले होते. यामध्ये लाभार्थ्यांची पेन्शन अन्य बँकेत जमा झाली आहे. ती तत्काळ द्यावी. मृत झालेल्या लाभार्थ्यांची पेन्शन ते हयात होते, त्या कालावधीपर्यंतची त्यांच्या वारसास मिळावी, या प्रमुख मागणीसह अन्य सतरा मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते. त्यापैकी अन्य बँकेत जमा झालेली दोघा लाभर्थ्यांची पेन्शन तत्काळ दिली. मृत लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून त्याच्या वारसांना धनादेश देण्यात येणार आहे. यासोबत अर्ज केलेले २३ प्रलंबित प्रकरणांमधील ७ प्रकरणे पुढील बैठकीमध्ये घेण्यात येणार आहेत. १३ अर्जदारांना अपील करण्यास सांगितले. सोबत पोस्ट खात्यामध्ये खाते काढण्यास परवानगी दिली. संघटनेच्या बहुतांश मागण्या मान्य केल्याने आंदोलन मागे घेतले. विश्वास बालिघाटे, सुरेश सासणे, सर्जेराव कांबळे, रोहन पाटील, सुजाता जेरे, धनश्री कोळेकर, शिवाजी कोळी, सिकंदर नदाफ आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57510 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top