निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन
निधन

निधन

sakal_logo
By

01250
उषाताई कामत
चंदगड : येथील उषाताई उर्फ शोभा भास्कर कामत ( वय ५२) यांचे निधन झाले. (मूळचे सिध्दापूर ता. कुंदापूर, जि. उडुप्पी) येथील कामत कुटुंबिय काजू प्रक्रिया उद्योगाच्या निमित्ताने ४० वर्षांपूर्वी चंदगडला आले. पती भास्कर कामत यांनी व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यात सक्रिय योगदान देत ओळख निर्माण केली. त्यांचाच आदर्श आणि मार्गदर्शनाने अनेकांनी काजू उद्योग सुरु केले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, सून, नात असा परिवार आहे.

21349
प्राजक्ता शिपुरे
कोल्हापूर ः गजानन महाराजनगर येथील प्राजक्ता (राणी) प्रशांत शिपुरे (वय ४०) यांचे निधन झाले. प्रशांत रामचंद्र शिपुरे यांच्या त्या पत्नी व शेतकरी संघाचे माजी कर्मचारी आर.डी. शिपुरे यांच्या त्या स्नुषा होत. त्यांच्या मागे पती, मुलगा, सासु-सासरे, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवार (ता.१३) आहे.

01248
कमळाबाई मटकर
चंदगड : कानुर बुद्रूक (ता.चंदगड) येथील कमळाबाई बाळु मटकर (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन विवाहित मुलगे, तीन विवाहित मुली, सुना, नातवंडे, पणत॔वडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी ( ता.१३) सकाळी आहे. प्रांत ग्राहक संरक्षणचे पदाधिकारी बापू मटकर यांच्या त्या आई होत.

21430
बजरंग सूर्यवंशी
कोल्हापूर : सोमराज कॉम्प्लेक्स, जुनी मोरे कॉलनी येथील रहिवासी श्री. बजरंग आप्पाण्णा सूर्यवंशी (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

01324
विष्णू पाटील
बाजार भोगाव : पोहाळे तर्फ बोरगाव (ता. पन्हाळा ) येथील विष्णू दशरथ पाटील (वय ८२) यांचे निधन झाले. न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक प्रा. युवराज पाटील, माजी उपसरपंच सरदार पाटील व काळजवडे येथील गंगा मेडीकलचे मालक विलास पाटील यांचे वडील होत. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता.१३)आहे.


02951
लक्ष्मी म्हापसेकर
राधानगरी : येथील लक्ष्मी गणपती म्हापसेकर (वय ८८) यांचे निधन झाले. निवृत्त अभियंता सुरेश म्हापसेकर व सामाजिक कार्यकर्ते सुहास म्हापसेकर यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे दोन मुले, पाच मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे, रक्षा विसर्जन शुक्रवारी (ता.१३ ) आहे.

02672

तरूण शेतकरयाचा
ह्रदयविकाराने मृत्यू
उत्तूर ता. १२ ः बेलेवाडी हुबळगी (ता.आजरा) येथील आकाश उर्फ गोट्या बाळासाहेब मुदाळकर( वय २२) तरूण शेतकरयाचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गणपतराव तोरस्कर यांच्या पाणी योजनेद्वारे सुमारे १००शेतक-याच्या शेताला पाणी पुरवठा करण्याचे काम हो करीत होता. रात्री अपरात्री तो गरजू व्यक्तींच्या मदतीला धावून जात होता. दोन दिवसापासून त्याला अस्वस्थ वाटत होते. आज सकाळी त्याला पुन्हा त्रास जाणवू लागला. पिंपळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी तो दाखल झाला. पुढील उपचारासाठी गडहिंग्लज गाडीतून जाताना त्याच्या छातीत दुखू लागले. यामुळे त्याला उतूर येथील आरोग्य केंद्रात दाखल केला. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई,भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता.१३) आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57533 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top