ठेकेदारांकडून कामे करुन घ्या, जनता दलाचे साकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठेकेदारांकडून कामे करुन घ्या, जनता दलाचे साकडे
ठेकेदारांकडून कामे करुन घ्या, जनता दलाचे साकडे

ठेकेदारांकडून कामे करुन घ्या, जनता दलाचे साकडे

sakal_logo
By

21358
गडहिंग्लज : विकासकामे सुरू करण्याबाबतचे निवेदन प्रशासक बाबासाहेब वाघमोडे यांना देताना जनता दलाचे शिष्टमंडळ. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)

ठेकेदारांकडून कामे करुन घ्या
जनता दलाचे साकडे; विकासाला खीळ, आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : जनता दल नगरसेवकांच्या प्रयत्नातून आलेल्या निधीतील कामात आडकाठी करण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाला आहे. यातून ज्या ठेकेदारांच्या नावे निविदा मंजूर झाली, त्यांनी पावसाळा तोंडावर असूनही अद्याप काम सुरू केलेले नाहीत. यामुळे शहर विकासाला खीळ बसत आहे. प्रशासकांनी तातडीने संबंधित ठेकेदारांकडून ही कामे सुरू व्हावीत, अन्यथा जनता दलातर्फे आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.
पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना याबाबत निवेदन दिले आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना व राज्य सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानातून (जिल्हास्तर) रस्ते, गटर बांधणी व ओढ्यावर साकव बांधण्याच्या कामाचा ठराव २२ ऑक्टोबर २०२१ च्या सभेत केला आहे. २० डिसेंबर २०२१ रोजी यासाठी निधी मंजूर झाला. तेरा कामांची निविदा प्रसिद्ध केली. विशेष म्हणजे निविदा भरण्याच्या प्रक्रियेत पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच राजकीय हस्तक्षेप झाला. या कामांचा प्रशासकीय ठराव १३ एप्रिल रोजी झाला असून कामाची समजही १८ एप्रिलला दिली आहे. आता पावसाळा तोंडावर आला आहे. कामे पूर्ण करण्याची मुदतही संपत आली आहे. परंतु संबंधित ठेकेदारांनी अजूनही कामे सुरु केलेली नाहीत. या प्रकाराने विकासाला खीळ बसली असून ठेकेदारांना कामाचा आदेश करुन कामे करुन घ्यावीत, अशी मागणी आहे. माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी, बसवराज खणगावे, महेश कोरी, नरेंद्र भद्रापूर, राजेश बोरगावे, नितीन देसाई, उदय कदम, सुनिता पाटील, नाज खलीफा, शशिकला पाटील, चिन्मय देशपांडे, सागर पाटील, संदीप झेंडे, अमजद मिरा, इम्रान चाँद यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
---------------
चौकट
सुरु न झालेली कामे...
गर्दे नगर, केडीसीसी कॉलनी, काळभैरी रोडवरील शाहू कॉलनी, संकेश्‍वर रोड परिसर, गवळी ते पाटील घर रस्ता, नदीवेस या भागातील रस्ता खडीकरण-डांबरीकरण, पोतदार लेआऊट ओढ्यावर साकव, पालिका इमारतींवर उर्जा प्रकल्प, काळभैरी रोड नाला बांधकाम ही कामे सुरु झाली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57551 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top