दुंडगेत ब्रम्हदेव मंदिराचा आजपासून वास्तूशांती सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुंडगेत ब्रम्हदेव मंदिराचा आजपासून वास्तूशांती सोहळा
दुंडगेत ब्रम्हदेव मंदिराचा आजपासून वास्तूशांती सोहळा

दुंडगेत ब्रम्हदेव मंदिराचा आजपासून वास्तूशांती सोहळा

sakal_logo
By

दुंडगेत ब्रह्मदेव मंदिराचा
आजपासून वास्तुशांती सोहळा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील श्री ब्रह्मदेव मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळा शुक्रवारपासून (ता. १३) सुरू होत आहे. शनिवारपर्यंत (ता. १४) हा सोहळा चालणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. ब्रह्मदेव जीर्णोद्धार समितीतर्फे या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
निडसोशी मठाचे श्री. शिवलिंगेश्‍वर महास्वामी, हत्तरगीचे गुरुसिद्धेश्‍वर महास्वामी, खानापूरचे शिवाचार्य महास्वामी, हुक्केरीचे शिवबसव महास्वामी, हिटणीचे प्रभुलिंगेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांच्या सानिध्यात हा सोहळा होईल. शुक्रवारी गंगापूजन, दुपारी मूर्ती व सुवासिनी जलकुंभ मिरवणूक आहे. रात्री आठला सुवासिनी ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर महाप्रसाद आहे. रात्री भजन आहे. शनिवारी (ता. १४) पहाटे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व रुद्राभिषेक, गणेश पूजन, महामंडळ आरती, हनुमान पालखी मिरवणूक, महास्वामींचे स्वागत व आंबिल कुंभाची मिरवणूक, सव्वा अकराला ब्रह्मदेव मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, महास्वामींचे आशीर्वचन होणार आहे. दुपारी महाप्रसाद आयोजण्यात आला आहे. रात्री आठला मनोरंजनाचा कार्यक्रम होईल. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, पोलिस उपअधीक्षक राजीव नवाळे, पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, भरमा रुद्रापुरे, तमाण्णा पाथरवट यांची प्रमुख उपस्थिती आहे. या सोहळ्यात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57557 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top