सिद्धेश्‍वर सोसायटी अध्यक्षपदी पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धेश्‍वर सोसायटी अध्यक्षपदी पाटील
सिद्धेश्‍वर सोसायटी अध्यक्षपदी पाटील

सिद्धेश्‍वर सोसायटी अध्यक्षपदी पाटील

sakal_logo
By

21359
ऋषिकेश पाटील, भीमगोंडा पाटील

सिद्धेश्‍वर सोसायटी अध्यक्षपदी पाटील
नूल : जरळी (ता. गडहिंग्लज) येथील श्री सिद्धेश्वर विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी ऋषिकेश पाटील यांची तर उपाध्यक्षपदी भीमगोंडा पाटील यांची एकमताने निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून विजय तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निवडी पार पडल्या. अध्यक्षपदासाठी पाटील यांचे नाव नारायण डोंगरे यांनी सुचवले तर गंगाराम बाबानावर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी भीमगोंडा पाटील यांचे नाव दिलीपकुमार पाटील यांनी सुचविले, तर अजित कुलकर्णी यांनी अनुमोदन दिले. या वेळी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा तोडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेतर्पे तोडकर यांचा सत्कार झाला. या वेळी अजित कुलकर्णी यांचे भाषण झाले. बैठकीस वीरगोंडा देसाई, यल्लाप्पा धनगर, राजेंद्र खटावकर, सुनील चोथे, सिद्धाप्पा कांबळे, संगीता शिंत्रे, सुनिता जाधव, सचिव जोतिबा चौगुले, संजय फुडे, संजय जाधव व सुरेश खटावकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57558 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top