
मधुकर देसाई अध्यक्षपदी
21365
मधुकर देसाई
21367
विश्वनाथ पाटील
मधुकर देसाई अध्यक्षपदी
भादवण : सरोळी (ता. आजरा) येथील श्री कृष्णराव देसाई विविध कार्यकारी (विकास) सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी मधुकर देसाई, तर उपाध्यक्षपदी विश्वनाथ धोंडिबा पाटील यांची निवड झाली. अध्यक्षपदासाठी देसाई यांचे नाव दत्तात्रय बाळकू कुराडे यांनी सुचविले. रामदास वसंत पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी पाटील यांचे नाव शिवाजी बंडू पाटील यांनी सुचविले. गणपती रामचंद्र पाटील यांनी अनुमोदन दिले. मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. सर्वांना विश्वासात घेऊन संस्थेचा कारभार केला जाईल. संस्थेची प्रगती साधण्यासाठी कटिबध्द राहू, अशी भावना अध्यक्ष मधुकर देसाई यांनी व्यक्त केली. या वेळी संचालक मारुती बंडू पाटील, भिकाजी रामचंद्र पाटील, धनाजी बंडू सुतार, वसंत धोंडिबा कांबळे, विद्या धनाजी पाटील, श्रेया सूरज पाटील उपस्थित होत्या.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57568 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..