मुंगूरवाडीत आज शासन आपल्या दारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंगूरवाडीत आज शासन आपल्या दारी
मुंगूरवाडीत आज शासन आपल्या दारी

मुंगूरवाडीत आज शासन आपल्या दारी

sakal_logo
By

मुंगूरवाडीत आज
शासन आपल्या दारी
दुगूनवाडी, ता. ११ : मुंगूरवाडी (ता. गडहिंग्लज) येथे महसूल लोकजत्रा योजनेंतर्गत शासनाच्या सर्व विभागांची कामे एकाच छताखाली करण्यासाठी मुंगूरवाडी, दुगूनवाडी, कडाल, मासेवाडी, हिडदुगी या गावांसाठी महसूल विभागातर्फे शुक्रवारी (ता. १३) व. भि. नौकुडकर हायस्कूलच्या प्रांगणात शासन आपल्या दारी योजनेचे नियोजन केले आहे. सर्व गावांतील नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. या लोकजत्रेत तहसील कार्यालय, एकात्मिक बाल विकास, पशुवैद्यकीय, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पंचायत समिती, पंचायत समिती आरोग्य विभाग, उपअधीक्षक भूमी अभिलेख, महाराष्ट्र परिवहन मंडळ, पोस्ट ऑफिस, पाटबंधारे, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत विभाग, कृषी, महाराष्ट्र वीज वितरण कंपनी, भारत सरकार निगम, दुय्यम निबंधक सहकारी संस्था, वन आदी विभागांशी संबंधित प्रलंबित कामांची पूर्तता करणे, महत्त्वाचे दाखले, प्रमाणपत्रे यांचे वाटप, याशिवाय शासकीय योजनांची माहिती देणे, लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन आदी विविध प्रकारची कामे एका छताखाली होणार आहेत. सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन मंडल अधिकारी रजनी चंदनशिवे यांच्यासह तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, पोलिसपाटील यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57569 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top