
कडगावात आजपासून नामदेव महाराज मंदिर वास्तूशांती सोहळा
कडगावात आजपासून नामदेव
महाराज मंदिर वास्तूशांती सोहळा
गडहिंग्लज, ता. १२ : कडगाव (ता. गडहिंग्लज) येथील श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिराची वास्तूशांती, मूर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहन सोहळा उद्यापासून (ता. १३) सुरू होत आहे. उद्या सकाळी सातला पाण्याच्या घागरी आणणे व माहेरवाशिणींचा दुरडी आणण्याचा कार्यक्रम आहे. त्यानंतर वास्तू प्रवेश आहे. १४ ते १८ मे दरम्यान रोज रात्री आठला कडगाव पंचक्रोशीतील भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम आहे. १८ मे रोजी संत नामदेव महाराज यांची मूर्ती व मंदिराचा कळसाची मिरवणूक निघणार आहे. दुपारी एकनंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. १९ मे रोजी दिवसभर धार्मिक विधी व भजनाचा कार्यक़्रम होईल. रात्री नऊला नामदेव महाराजांचे १७ वे वंशज ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज यांचे किर्तन होणार आहे. २९ मे रोजी सकाळी दहा वाजता प. पू. किसन महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन समारंभ होणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सतीश पाटील, उदय जोशी यांची प्रमुख उपस्थिती आहे. दुपारी बारा नंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. श्री नामदेव भजनी मंडळ, सर्व वारकरी सांप्रदाय व ग्रामस्थांनी नियोजन केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57579 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..