गुरुजींच्या पगार, पेन्‍शनवर १ हजार कोटींचा खर्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुरुजींच्या पगार, पेन्‍शनवर १ हजार कोटींचा खर्च
गुरुजींच्या पगार, पेन्‍शनवर १ हजार कोटींचा खर्च

गुरुजींच्या पगार, पेन्‍शनवर १ हजार कोटींचा खर्च

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद फोटो

वर्षभरात गुरुजींवर १ हजार कोटी खर्च

प्रती विद्यार्थी शिक्षक संख्याही मर्यादित; दिल्‍ली पॅटर्नप्रमाणे हवी शैक्षणिक गुणवत्ता
सदानंद पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १२ : जिल्‍हा परिषदेत मोठी आस्‍थापना म्‍हणून प्राथमिक शिक्षण विभाग व त्यानंतर आरोग्य विभागाचा क्रमांक लागतो. प्राथमिक शिक्षण विभागाकडे ७ ५३८ शिक्षक असून त्यांच्या पगारावर, पेन्‍शन, वेतनेतर लाभ, विमा, वैद्यकीय बिले, वेतनातील फरक यावर वर्षाकाठी सुमारे १ हजार कोटी रुपये खर्च केले जातात. जिल्‍हा परिषदेच्या शिक्षकांचा पगार हा दिल्‍लीच्या शाळांपेक्षा चांगला आहे. प्रती विद्यार्थी शिक्षक संख्याही जास्‍त आहे. मात्र गुणवत्तेबाबतीत दिल्‍लीच्या शाळा कैकपटीने पुढे आहेत. जिल्‍ह्यातही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत शिक्षक पुरेपूर योगदान देवून गुणवत्ता वाढवतात मात्र सर्वच शिक्षकांनी झटून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्‍न करणे आवश्यक असून हे यासाठी प्रशासनाला कंबर कसावी लागणार आहे.

कोल्‍हापूर जिल्‍हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा शिष्‍यवृत्ती परीक्षेत हातखंडा आहे. कोरोनानंतर अनेक कारणांनी व शिक्षकांनी केलेल्या प्रयत्‍नांमुळे काही ठिकाणी पटसंख्या वाढत आहे. प्रयोगशील शिक्षकांची संख्याही वाढू लागली आहे. शाळांच्या विकासात लोकसहभागाचे प्रमाण वाढले आहे. या सर्व जमेच्या बाजू आहेत. मात्र हे सर्व रिझल्‍ट ठराविक तालुके, निवडक शाळा व तेच ते शिक्षक यांच्याभोवती फिरतात. शिक्षक बदलले की रिझल्‍ट बदलतो, अशी परिस्‍थिती आहे. याउलट दिल्‍लीच्या शाळांची परिस्‍थिती आहे. जिल्‍हा परिषद शाळेच्या तुलनेत पगार कमी, प्रती शिक्षक विद्यार्थी संख्या आणि वर्ग खोल्याही दुप्‍पट अशी परिस्‍थिती असताना दिल्‍लीच्या शाळांची गुणवत्ता मात्र उच्‍च दर्जाची आहे.

वेगळ्या उपक्रमात केवळ
१०० शिक्षकांची नोंद
पारंपरिक पध्‍दतीने शिक्षण देण्याचा, नवप्रयोगांचा अभाव आहे. असे प्रयोग करणारे शिक्षक हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहेत. जिल्‍ह्यातील उत्‍कृष्‍ट शिक्षक शोधून त्यांच्या माध्यमातून शालेय पाठ तयार करण्याचा उपक्रम कागल तालुक्याचा शिक्षण विभाग करत आहे. मात्र यात केवळ १०० शिक्षकांची नोंद आहे. एकूण शिक्षकांच्या तुलनेत ही संख्या अगदीच नगण्य आहे.

दृष्टिक्षेपात
* एकूण प्राथमिक शिक्षक - ७५३८
*दरवर्षीचा पगारावर खर्च - ६७२ कोटी
*पेन्‍शनवर होणारा खर्च - २६० कोटी
*वेतन फरक, इतर लाभ - ६७ कोटी

जिल्‍हा परिषदेत सर्वाधिक वेळ हा शिक्षक बदली, पदोन्‍नती, समायोजन यावरच खर्च होतो. हा वेळ गुणवत्ता वाढीसाठी देणे आवश्यक आहे. दरवर्षी ठरावीक शिक्षकांमुळे गुणवत्तेचा डंका वाजतो. त्यांनीच गुणवत्ता वाढीचा मक्‍ता घेतलेला नाही. इतरांनाही त्यांची जबाबदारी समजावून द्यावी. जे ऐकतील त्यांना प्रोत्‍साहन द्यावे व न ऐकणाऱ्यां‍वर कारवाई करावी.
-उमेश आपटे, माजी जिल्‍हा परिषद अध्यक्ष.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57583 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top