
डॉ. शिंदे इंजिनिअरिंगमध्ये टेक मंथन स्पर्धेला प्रतिसाद
21374
भडगाव : टेक मंथन उपक्रमाचे उद्घाटन करताना श्रीपतराव शिंदे. शेजारी स्वाती कोरी, जी. एम. कुंभार, विनायक करंबळी, सूरज वडगुले आदी.
डॉ. शिंदे इंजिनिअरिंगमध्ये
टेक मंथन स्पर्धेला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : भडगाव येथील डॉ. ए. डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये टेक मंथन टू के-२२ हा कार्यक्रम झाला. त्या अंतर्गत आयोजित टेक्नीकल व नॉन टेक्नीकल स्पर्धांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
मेकॅनिकल, सिव्हील, इलेक्ट्रीकल विभागानुसार पेपर प्रेझेंटेशन, टेक्नीकल क्वीज, नॉन टेक्नीकल गेमिंग या स्पर्धा झाल्या. मेकॅनिकल पेपर प्रेझेंटेशनमध्ये ओमकार आवडण-निलेश आवडण, योगेश फाटक-सिद्धेश नाडगौडा, गौरव वाडेकर-विनय पाटील, टेक्नीकल क्विजमध्ये यश कुंभार-संदेश पाटील, सूरज माळी-किशोर माळी, विवेक गवस-वैभव भगदुरे, इलेक्ट्रीकल विभागातून सुयोग सुतार-बाबासाहेब पडालकर, सुशांत सुतार, रोहित कांबळे-महेश देसाई, टेक्नीकल क्वीजमध्ये जयदीप देसाई-स्वप्नाली खरुडे, विद्या पोवार-अक्षता तेलवेकर, सुशांत कुंभार-सुयोग सुतार, सिव्हील विभागात रणजित पाटील-विश्वजित ऐकले, रोहित पाटील, अमित भेंडीगिरी-आशिष काले, पंढरीनाथ मोरे-सूरज गिलबिले, प्राजक्ता देसाई-तेजश्री जंगली, टेक्नीकल क्विजमध्ये प्रताप चव्हाण-रणजित कांबळे, हर्षल पाटील-विश्वजित ऐकले, रणजित पाटील-सुशांत चव्हाण यांनी यश मिळविले. संस्थेचे अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे, सचिव प्रा. स्वाती कोरी यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. महापारेषणचे सहायक अभियंता विनायक करंबळी, प्रा. किशोर जोशी, पराग दावणे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. प्रा शरद किल्लेदार यांनी सूत्रसंचालन केले. प्र. प्राचार्य जी. एम. कुंभार यांनी आभार मानले. प्रा. सूरज वडगुले, प्रा. बसवराज आरबोळे यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57584 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..