पारिचारिका दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारिचारिका दिन
पारिचारिका दिन

पारिचारिका दिन

sakal_logo
By

21438

परिचारीका दिनानिमित्त
शहरात जनजागृती फेरी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.१२ ः जागतिक परिचारिका दिनानिमित्त महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियन कोल्हापुरातील खासगी व शासकीय नर्सेस यांनी शहरातून जनजागृती रॅली काढली. परिचर्या सेवेच्या आद्य जनक फ्लोरेंस नाइटिंगेल यांच्या जन्मदिवसानिमित्त १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो.
त्याचाच भाग म्‍हणून ताराराणी चौक, दसरा चौक, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक अशी मोटारसायकल रॅली काढली.
यात परिचारीका व परिचरही सहभागी झाले. परिचारिकांवर होणारे अत्याचार व पिळवणूक थांबवावी याबाबत जनजागृती फलक लावण्यात आले तसेच घोषणाही देण्यात आल्या. परिचारीकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने लक्ष घालून ते तातडीने सोडवावेत अशी मागणी करण्यात आली.
यावेळी डॉ. प्रकाश बांदिवडेकर, कामगार नेते अतुल दिघे, संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक निलेश सुतार, लोक जनशक्ती पार्टीचे बाळासाहेब भोसले, गव्हर्मेंट संघटनेचे संदीप नलवडे, अमोलकुमार पाटील, वाय. डी. माने कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य किशोर मोरे, स्वाती मोरे, अपेक्स नर्सिंग स्कूलचे प्राचार्य यशवंत सूर्यवंशी, प्रणोती कांबळे, महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सिंगचे राज्याध्यक्ष सतीश सर्वगोडे, राज्य सचिव डेव्हिड लोखंडे, राज्य उपाध्यक्ष रमेश घाडगे, राज्य संचालक अभिजीत हुपरीकर, जॉन भोरे, दीपेश कांबळे, सॅमसंग माजगावकर, ज्योती पाटील, सुवर्णा गवळी, विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57590 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top