महेश काळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महेश काळे
महेश काळे

महेश काळे

sakal_logo
By

संगीताशी घट्ट मैत्रीच तुमची
गायन कला खुलवतेः काळे

कोल्हापूर, ता. १२ः ‘‘ ज्यांना सारेगमही माहित नसते असा एखादी व्यक्ती आत्मविश्वासाने एखादा राग, बंदीश सुरेल गाते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर स्मितहस्य असते, ते मला सांगते की, त्याच्या गळ्यातून उमठणाऱ्या गाण्यापेक्षा त्याची संगीताशी मैत्री घट्ट आहे. अशी मैत्री घट्ट होते तेव्हा तुमचे गाणं अधिक खुलून येते, असे प्रसिद्ध गायक महेश काळे यांनी व्यक्त केले.
संगीत मैफलीच्या निमित्ताने काळे कोल्हापूरात आले असता त्यांनी पत्रकारांशी आज संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
काळे म्हणाले की, ‘‘ गाणं शिकतानाच तुमचे कष्ठ, रियाजातील प्रामाणिकता गुरूंना दिसली पाहिजे. त्यासोबत गळा चांगला आहे त्यांनी चांगले संगीत एकलेही पाहिजे. त्यातून तुमच्या संगीत शिक्षणाचा मार्ग सुकर व पक्का होतो. कोल्हापूरचा गझल गायक प्रल्हाद जाधव कष्ठाळू व प्रामाणिक आहे. म्हणून त्याची वाटचाल यशाच्या दिशेने आहे. एकलाकार आणि श्रोत्यांचे नाते असते. त्यांच्या मागणीनुसार गाणी सादर करावी लागतात. तरीही आपल्या जुन्या पिढीने जो शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीताचा वारसा दिला. ती परंपराही नव्या पिढीला समजावी यासाठी मी माझ्या मैफलीत शास्त्रीय रागाची बंदीश, रचना त्यासोबत पंडीत जितेंद्र अभिषेकी किंवा अन्य दिग्गज नाट्य गायकांनी गायलेली नाट्यपदेही गातो. काही अंभगांनाही मी चाली लावल्या आहेत. यातून नवीपिढीला नवे काही सकस एकता यावे अशी अपेक्षा आहे. नवीन संगीत नाटक आज तयार होत नाहीत. त्यामुळे नवी नांदी पदे लिहीली जात नाहीत. अशा स्थितीत नव्याने कोणी नवे संगीत नाटक, नाट्यपदे लिहिली तर गायला आवडतील’’
शाहू संस्कृतिक मंदिरात उद्या (ता.१३) सायंकाळी सहा वाजता काळे यांच्या संगीतांची मैफल होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57591 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top