
जिनशासन स्थापना दिवस
२१३७७
जिनशासन स्थापना दिन उत्साहात
कोल्हापूर ः गुजरीतील श्री संभवनाथ जैन मंदिरात २ हजार ५७८ व्या जिनशासन स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा झाला. आचार्यदेव श्री विमलबोधीसुरीश्वरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. अर्हम ग्रुपने कार्यक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त 12 नवकार महामंत्रांचे स्मरण करून अभिवादन झाले. आचार्यदेव श्री विमलबोधीसुरीश्वरजी महाराज यांनी प्रवचनामध्ये जिनशासन स्थापन दिवसाचे महत्व सांगितले. छत्रपती शाहू महाराजांनी जैन समाजासाठी केलेल्या कार्याच्या माहितीबरोबरच राजर्षींच्या दूरदृष्टीबाबत विस्तृत विवेचन केले. अचलचंदजी हेमचंदजी परमार परिवाराने संयोजन केले. अर्हम ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी शासन ध्वजाला सलामी दिली. त्यानंतर ध्वजवंदन झाले. पांजारपोळमध्ये चारा वाटपही झाले. संकेत गांधी (मुंबई) यांनी सूत्रसंचालन केले.
...........
‘ओपेक्स''तर्फे १९ मेपासून नोकरी,
व्यवसाय संधी मार्गदर्शन कार्यक्रम
कोल्हापूर, ता. १२ ः ओपेक्स स्किल डेव्हलपमेंटच्या वतीने भारतातील अग्रगण्य जेनेरिक फार्मा रिटेल जेनेरीकार्ट कंपनीसाठी १९ मेपासून तीन दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. नोकरीची व व्यवसायाची संधी शोधणारी तरूणाई यामध्ये सहभागी होवू शकते.
जेनेरिकार्टचे भारतभरात 1000 पेक्षा जास्त फार्मसी स्टोअर आहेत आणि ही संधी तरुणांना भारतातील या अग्रगण्य जेनेरिक मेडिसिन कंपनीमध्ये सामील होण्यासाठी आणि त्याचा भाग बनण्यास मदत करणार आहे. पहिल्या सत्रात जेनेरिकर्ट मेडिसिन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये नोकरीच्या संधी शोधणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी वॉक इन-इंटरव्यू घेण्यात येतील. रिटेल फार्मासिस्ट, बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, मार्केटिंग आणि अॅडमिनिस्ट्रेशन या पदांसाठी फार्मसी, मॅनेजमेंट, कॉमर्सचे पदविका आणि पदवीधर अर्जदार अर्ज करू शकतात. दुसऱ्या सत्रात, जेनरीकार्टसोबत व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी फ्रेंचाईजी सेमिनार आयोजित केला जाईल. १९ मे रोजी भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, २० मे रोजी आष्टा येथील अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ फार्मसी आणि २१ मे रोजी बेळगाव येथील मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी येथे हा कार्यक्रम होईल. अधिक माहिती व नोंदणीसाठी www.opexindia.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले.
............
२१३७९
माई ह्युंदाई शोरूमला
कंपनीच्या पदाधिकाऱ्यांची भेट
कोल्हापूर, ता. १२ ः ह्युंदाई मोटर्सचे वेस्ट झोनचे बिझनेस को-ऑर्डीनेटर टी. के. सोन, बिझनेस हेड उमेश चंद्रात्रे आणि रिजनल सेल्स हेड अजय शर्मा यांनी माई ह्युंदाई शोरूमला भेट दिली. माई ह्युंदाईचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांच्या हस्ते त्यांचे स्वागत झाले. शांतीनाथ भिवशीकर यांना अल्कझार कारची डिलिव्हरी देण्यात आली.
‘ह्युंदाई‘च्या अधिकाऱ्यांनी माई ह्युंदाईच्या शोरुम, सर्व्हीस आणि वर्कशॉपची पाहणी केली. माई ह्युंदाई ग्राहकांना देत असलेल्या सेवा सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. कर्मचाऱ्यांशी संवाद साधतांना बिझनेस हेड उमेश चंद्रात्रे यांनी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा धावता आढावा घेतला. ह्युंदाई मोटर्सकडून उत्पादन क्षमता वाढवून ग्राहकांना त्यांनी बुकींग केलेल्या गाड्या लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही दिली. कोल्हापूरनंतर माई ह्युंदाईच्या इचलकरंजी येथील शोरुमला भेट दिली. तेथील बिझनेस हेड अमित चव्हाण यांनी ह्युंदाई मोटर्सच्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी माई ह्युंदाईचे संचालक दिग्विजय राजेभोसले, जनरल मॅनेजर विशाल वडेर, प्रकाश पाटील, महेश गेज्जी, सुनिल खांडेकर, उमेश पाटील आदी उपस्थित होते.
..........
जयप्रभा’साठी ८९ व्या
दिवशी साखळी उपोषण
कोल्हापूर, ता. १२ ः जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणाठी कायमस्वरुपी खुला व्हावा, या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व कलाप्रेमीतर्फे सुरु असलेले साखळी उपोषण आज ८९ व्या दिवशीही सुरू राहिले. चित्रपती भालजी पेंढारकर यांची नात सीमा लिमये यांनी आज आंदोलनाला भेट दिली. महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, संचालक रणजित जाधव, सतीश बिडकर, बाबा पार्टे, संतोष शिंदे, दीपक महामुनी, अशोक मराठे, सुनील मुसळे, राज पाटील, बळवंत अतिग्रे, निलेश जाधव, राजू पोळ, चंदा बेलेकर आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57592 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..