आजरा अर्बन बँकेच्या मुंबई शाखेचे नुतनीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा अर्बन बँकेच्या मुंबई शाखेचे नुतनीकरण
आजरा अर्बन बँकेच्या मुंबई शाखेचे नुतनीकरण

आजरा अर्बन बँकेच्या मुंबई शाखेचे नुतनीकरण

sakal_logo
By

21313
मुंबई : नूतनीकरण झालेल्या आजरा बँकेच्या येथील शाखेचे उद्‍घाटन करताना आमदार प्रकाश आबिटकर. आमदार अजय चौधरी, अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, बॅंकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे व संचालक.

आजरा अर्बन बँकेच्या
मुंबई शाखेचे नूतनीकरण
आजरा, ता. १३ : आजरा अर्बन बॅंकेच्या मुंबईतील ना. म. जोशी मार्गावरील शाखा १९७५ पासून कार्यरत आहे. या शाखेच्या कार्यालयाचे सर्व सोयींनीयुक्त अशा प्रशस्त जागेत नूतनीकरण करण्यात आले. राधानगरी विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नूतनीकरण झालेल्या शाखेचे उद्‍घाटन झाले. शिवडी विधानसभा मतदार संघाचे आमदार अजय चौधरी, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे उपाध्यक्ष विठ्ठल भोसले, संचालक विष्णू घमरे आदी प्रमुख उपस्थित होते.
बॅंकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात ते म्हणाले, ‘‘गत सहा दशके बॅंकेने ऑडीट वर्ग ‘अ’ घेतला आहे. नेट एनपीए शून्य टक्के आहे. कॉर्पोरेट कल्चर ही काळाची गरज आहे. त्यामुळे बॅंकेच्या शाखा कार्यालयाचे नूतनीकरण केले आहे.’’
आमदार आबिटकर म्हणाले, ‘‘आजरा बॅंक ही आपल्या भागातील असून बॅंकेची प्रगती प्रशंसनीय आहे. तत्पर सेवा, काटेकोर नियोजन, पारदर्शक कारभार यामुळे बॅंकेची घोडदौड सुरू आहे.’’ आमदार चौधरी म्हणाले, ‘‘मुंबईतील गिरणगाव परिसरात गिरणी कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी या बॅंकेच्या माध्यमातून मदत झाली. पश्चिम महाराष्ट्रातील या बॅंकेचा मला सार्थ अभिमान आहे. बॅंकेला सर्वतोपरी सहकार्य राहील.’’ अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी बॅंकेमार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांची माहिती दिली. उपाध्यक्ष किशोर भुसारी, संचालक सुरेश डांग, विलास नाईक, प्रकाश वाटवे, डॉ. दीपक सातोसकर, रमेश कुरुणकर, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके, प्रणिता केसरकर, शैला टोपले, अस्मिता सबनीस, सूर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण, अॅड. सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे, शाखा मार्गदर्शक कृष्णकांत कांदळकर, सदाशिव सावंत, भैरु टक्केकर, कान्होबा माळवे आदी उपस्थित होते. बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57598 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top